गावठी कट्टा विकणारा गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

गावठी कट्टा विकणारा गजाआड.

 गावठी कट्टा विकणारा गजाआड.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरात गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्य ामतीन  बशीर शेख वय 42 हा जुना बाजार भिस्त गल्ली याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन एक गावठी कट्टा व जीवंत काडतूस असा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, काल अनील कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहिती मिळाली की बंगाल चौकी येथे एक इसम गावठी कट्टा बेकायदेशीररित्या बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने फिरत आहे. कटके यांनी गणेश इंगळे, मन्सूर सय्यद, संदीप घोडके, शंकर चौधरी, संदीप पवार, रवी किरण सोनटक्के दीपक शिंदे, योगेश सातपुते, कमलेश पाथरूडट, मेघराज कोल्हे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना या ठिकाणी जाऊन कारवाई करा असा आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार दोन पंच सह बंगाल चौकी अहमदनगर येथे जाऊन सापळा लावून इसमाचा शोध घेत असताना बंगाल चौकी रिक्षा स्टॉप जवळ बातमी मधील वर्णनाचा इसम उभा राहून आजू बाजूला संशयित नजरेने पाहणी करीत असल्याचे दिसले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांची खात्री झाल्याने या इसमास ताब्यात घेऊन त्याला पोलिस स्टाफ व पंचांची ओळख सांगून त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव मतीन बशीर शेख वय 42 जुना बाजार भिस्त गल्ली अहमदनगर असे असल्याचे सांगितले. पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंग झडतीत एक बनावट गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकूण तीस हजार तीनशे रु.किंमतीचा गावठी कट्टा व जिवंत काडतुस मिळून आल्याने ते पंचांसमक्ष जप्त करण्यात आले होते .कोतवाली पो. स्टे.ला भारतीय हत्यार कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई कोतवाली पो. स्टे हे करीत आहेत.
आरोपी मतीन बशीर शेख यांचे विरुद्ध एमआयडीसी, येरवडा पोस्ट पुणे येथे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक विशाल ढवळे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी व नगर शहर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment