दहावीचा निकाल जाहिर. इतिहासात प्रथमच मूल्यांकन आधारित... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

दहावीचा निकाल जाहिर. इतिहासात प्रथमच मूल्यांकन आधारित...

 दहावीचा निकाल जाहिर. इतिहासात प्रथमच मूल्यांकन आधारित...

राज्य 99.95% नगर जिल्हा 99.97%.
दहावीव्या निकालाची वेबसाईट क्रॅश, निकाल पाहण्यात अडचणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना महामारी या दुसर्‍या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांच्या नववीच्या वार्षिक परीक्षेचा निकालावर मूल्यांकन करून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर केला. राज्याचा निकाल 99.95% तर नगर जिल्ह्याचा निकाल 99.97% लागला आहे. इतिहासात प्रथमच मूल्यांकन आधारावर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. राज्यात एकूण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा कोरोनामुळे ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले गेले आहेत. त्यामुळे एकही दिवस वर्ग न भरता व परीक्षा न देता लागलेला हा पहिलाच निकाल ठरला आहे. नगर जिल्ह्यातून मार्च 2021 या वर्षातील परीक्षेसाठी 70 हजार 589 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. पैकी 70 हजार 585 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. ते मंडळाकडे सादर केल्यानंतर 70 हजार 566 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे 19 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे दिसते आहे. मागील वर्षी (मार्च 2020) नगर जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के लागला होता. श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार असून मुलांचा निकाल 99.94 टक्के, मुलींचा निकाल 99.96 टक्के, 12 384 शाळांचा निकाल 100% लागला आहे. 4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तीन वर्षांच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही. एकूण आठ माध्यमांतर्गत 2020-21 वर्षातील एसएससी (इयत्ता दहावी) परीक्षेला एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी 9 लाख 09 हजार 931 मुलं असून मुलींची संख्या 7 लाख 48 हजार 693 एवढी आहे. या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांमार्फत सन 2021 मध्ये इ. 10 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण जाहीर केले जातील.

No comments:

Post a Comment