नेवासे येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे चंद्रभागेत स्नान, बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी केले पूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

नेवासे येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे चंद्रभागेत स्नान, बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी केले पूजन

 नेवासे येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे चंद्रभागेत स्नान, बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी केले पूजन


नेवासा-
गेल्या दोन वर्षांपासून कोविडच्या महामारीमुळे आषाढी पायी दिंडीची परंपरा खंडित झाली असली तरी ही ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे चंद्रभागेत डुबकी मारून गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांनी जलाभिषेक घातला यावेळी गुरुवर्य राष्ट्रसंत बद्रीनाथ महाराज तनपुरे बाबांनी  माऊलींच्या पादुकांचे सपत्नीक विधिवत पूजन केले.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते वैकुंठवाशी  ह.भ.प.बन्सी महाराज तांबे यांनी सुरू केलेल्या आषाढी पंढरपूर च्या पायी वारीने पन्नाशी ओलांडली आहे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पायी दिंडी बंद आहे त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांनी स्व:त आपल्या वाहनातून माऊलींच्या पादुका पंढरपूरला नेल्या तेथे त्यांनी चंद्रभागेत स्नान करून माऊलींच्या पादुकांचे जलाभिषेक घालून पूजन केले.पादुका डोक्यावर ठेऊन त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या भोवती रामकृष्ण हरी..पांडुरंग हरी..हरे राम हरे राम ...राम राम हरे हरे ,हरे कृष्ण हरे कृष्ण ..कृष्ण कृष्ण हरे हरेअसे  नामस्मरण करत प्रदक्षिणा घालून आपली वारी पूर्ण झाल्याचे समाधान मानले.
यावेळी पंढरपूर येथील वैकुंठवाशी हभप दांडेकर मामा महाराज यांच्या वारकरी मठात जाऊन माऊलींच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या होत्या.त्यानंतर ह.भ.प. गुरुवर्य बद्रीनाथ महाराज  यांच्या मठात त्यांनी पादुका नेल्या तेथे गुरुवर्य बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी माऊली मठात आल्याचा आनंद व्यक्त करत ह.भ.प. सौभाग्यवती सत्यभामा तनपुरे यांच्या समवेत सपत्नीक पूजन केले. पंढरपूर येथील संत तुकाराम महाराज मंदिरात संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप संजय महाराज मोरे यांनी हभप शिवाजी महाराज देशमुख यांचे स्वागत करून माऊली पादुकांचे दर्शन घेऊन पूजन केले. नेवासा येथून पंढरपूरला पादुका दर्शनासाठी गेलेल्या भक्तांमध्ये संतसेवक शिवाजी होन,हभप युवा कीर्तनकार राम महाराज खरवंडीकर,संदीप आढाव यांचा समावेश होता. पादुका प्रदक्षिणा झाल्यानंतर पंढरपूर येथे बांधण्यात येत असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या मठात गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांनी विसावा घेऊन माऊलींच्या पादुकांचे चंद्रभागा स्नान व विठ्ठल रुख्मिनी दर्शन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment