नेवासा येथील युवकांनी 17 तासात पूर्ण केली नेवासा ते पंढरपूर सायकलवारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 12, 2021

नेवासा येथील युवकांनी 17 तासात पूर्ण केली नेवासा ते पंढरपूर सायकलवारी

 नेवासा येथील युवकांनी 17 तासात पूर्ण केली नेवासा ते पंढरपूर सायकलवारी


नेवासा -
ओम साई सायकलिंग व ट्रॅकिंग ग्रूप आयोजित श्री ज्ञानेश्वर मंदिर,  नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूर सायकल वारी (257कि मी )17 तासांमध्ये पूर्ण केली. सदर सायकल वारी मध्ये ओम साई सायकल ग्रुप चे अध्यक्ष श्री प्रशांतभाऊ बडाख, श्री चंद्रकांत सेवक, श्री गणेश भाऊ माटे, श्री दिलीप गिरी, श्री भारत गोरे श्री अल्ताफ शेख व श्री पवन काळे यांनी सहभाग घेतला.
यावेळी ओम साई ग्रुप चे वतीने पांडुरंग चरणी महाराष्ट्र राज्यावर, देशावर जगावर आलेले कोरोना महामारी संकट जाऊ दे सर्वांचे आरोग्य चांगले राहू दे अशी प्रार्थना करण्यात आली.तसेच सर्वांनी आपले शारीरिक आरोग्य चांगले ठेवावे असे आवाहन श्री प्रशांतभाऊ बडाख यांनी केले. सायकल वारी करिता श्री दिनेश सरगैये, श्री आदित्य सेवक व श्री कुंडलिक लष्करे यांनी सहकार्य केले. सायकल रॅली 9 तारखेला पहाटे 5 वा.निघाली. राजमुद्रा चौक नेवासा फाटा, वडाळा, घोडेगाव, नगर, मिरजगाव, करमाळा, टेम्भुर्णी मार्गे पंढरपूर ला पोहीचली.  सायकल रॅलीला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला.सायकलिंग आरोग्य व शरीरासाठी किती उपयुक्त आहे हे अध्यक्ष प्रशांतभाऊ बडाख यांनी समजावून सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here