शिवशंभू अ‍ॅग्रो सर्व्हिसेस येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 5, 2021

शिवशंभू अ‍ॅग्रो सर्व्हिसेस येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवशंभू अ‍ॅग्रो सर्व्हिसेस येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः  कोरोनाच्या प्रभावामुळे रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी  वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या  विद्यमाने नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील शिवशंभू ग्रो सर्व्हिसेस नेवासा फाटा येथे आयोजित रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी सुरेशनगरचे विद्यमान सरपंच पांडुरंग पा.उभेदळ,त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्रा. सचिन कर्डीले, शिवशंभू ग्रो सर्व्हिसेस चे सुरेशराव पा. उभेदळ,पत्रकार बाळासाहेब देवखिळे,रमेश सावंत,सुरेश झिंजुर्डे,जयकिसन वाघ,भालचंद्र वरखडे,नितीन पाठक,संदीप आलवणे,अष्टविनायक रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटोळे,डॉ.मुकुंद शिंदे उपस्थित होते.
प्रास्ताविकात वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अभिजित शेळके यांनी संघटनेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत रक्तदानाचे महत्त्व विशद केले.
यावेळी बोलताना सुरेशनगरचे  सरपंच पांडुरंग पा. उभेदळ म्हणाले की ग्रामीण भागातील तरुणांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदाना सारख्या पवित्र कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यास काही दिवसापासून भासत असलेला रक्ताचा तुटवडा दूर होईल तसेच या कोरोनाच्या संकट काळात  वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनने रक्तदान शिबिराचे केलेले आयोजन हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
रक्तदान शिबिरास वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अभिजित शेळके,योगेश वरखडे,महेश उंदरे,संकेत नरसाळे,अजय थोरात,अनिकेत अवारे,प्रवीण थोरात,सचीन रेडे,कानिफनाथ मुरदारे, ऋषिकेश वरखडे,प्रताप वरखडे, ऋषिकेश घोरपडे,गणेश भणगे,अमृत उभेदळ,निखिल पवार, विशाल पिंपळे,बंडूराजे नेहे,गणेश वरखडे, अष्टविनायक रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटोळे,डॉ.मुकुंद शिंदे,शाहूराज जगताप,वरलक्ष्मी श्रीपत,पूजा प्रधान,गणेश गायकवाड, नलिनी मुसळे,संजय मूळे,वंदना देसाई,आकाश कोळगे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here