अ‍ॅड. राहुल झावरे यांच्या निष्ठेला न्याय : आत्मा समितीच्या अध्यक्षपदावर पुन्हा नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 5, 2021

अ‍ॅड. राहुल झावरे यांच्या निष्ठेला न्याय : आत्मा समितीच्या अध्यक्षपदावर पुन्हा नियुक्ती

 अ‍ॅड. राहुल झावरे यांच्या निष्ठेला न्याय : आत्मा समितीच्या अध्यक्षपदावर पुन्हा नियुक्ती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः कृषी विभागाच्या  आत्मा समितीच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. राहूल बबनराव झावरे यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. आ. नीलेश लंके यांना शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदावरून दुर करण्यात आल्यानंतर लंके यांच्या निष्ठेपायी अ‍ॅड. झावरे यांनी त्यावेळी आत्मा समितीसह शिवसेनेच्या युवासेना तालुका अधिकारी पदाचा राजिनामा दिला होता. नीलेश लंके आमदार झाल्यानंतर अ‍ॅड. झावरे यांची पुन्हा आत्मा समितीवर संधी देत आ. लंके यांनी त्यांच्या निष्ठेचा सन्मान केला आहे.
विविध समित्यांच्या पदाधिकार्‍यांच्या घोषणा झाल्यानंतर आत्मा समितीचे अध्यक्षपद कुणाकडे याची उत्सुकता होती. आ. लंके यांनी रविवारी आत्मा समितीची घोषणा करून ही उत्सुकता दुर केली असून अ‍ॅड. झावरे यांच्याकडे आत्माचे अध्यक्षपद पुन्हा सोपविण्यात आले आहे. औटी व लंके यांच्या संघर्षामध्ये अ‍ॅड. झावरे यांनी आ. लंके यांची बाजू लाउन धरीत उघडपणे तत्कालीन आमदार विजय औटी यांना प्रखर विरोध दर्शविला होता. विधानसभा निवडणूकीतही अ‍ॅड. झावरे हेच आग्रभागी होते. औटी - लंके संघर्षात पदावर पाणी सोडणार्‍या अ‍ॅड. झावरे यांना पुन्हा त्याच पदाची संधी  देत आ. लंके यांनी त्यांच्या निष्ठेला न्याय दिल्याचे माणले जात आहे. आ. लंके यांनी आत्मा समितीचे अध्यक्ष तसेच सदस्यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शिफारस केली होती. मुश्रीफ यांनी शिफारस केलेल्या सदस्यांची घोषणा केली.
आ. लंके यांनी जाहिर केलेले आत्मा समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे :  राहुल बबन झावरे शेती अध्यक्ष,  संतोष पोपट खाडे शेतकरी गट प्रतिनिधी, राजेंद्र बाबूराव थोरात फलोत्पादन प्रतिनिधी, संजय सुधाकर भालेकर फलोत्पादन प्रतिनिधी, सचिन राजाराम ठुबे पशुसंवर्धन प्रतिनिधी, राहूल नंदकुमार झावरे पंचायत समिती प्रतिनिधी, रोहिणी संतोष काटे पंचायत समिती प्रतिनिधी, तुळशीराम सावळेराम करकंडे फलोत्पादन प्रतिनिधी, भाउसाहेब गणपत खोडदे निविष्ठा पुरवठादार प्रतिनिधी, भागा लक्ष्मण गावडे निविष्ठा पुरवठादार प्रतिनिधी, सिताराम बबन देठे पशुसंवर्धन प्रतिनिधी, सुखदेव कचरू चितळकर पशुसंर्वधन प्रतिनिधी, दादाभाउ सुभाष सुंबे पशुसंवर्धन प्रतिनिधी, हरिश्चंद्र सुखदेव थोरात युवक मंडळ प्रतिनिधी, स्वाती जगदीश गागरे शेती महिला प्रतिनिधी, सुमन बाबासाहेब तांबे शेती महिला प्रतिनिधी, तात्यासाहेब मुरलीधर देशमुख शेतकरी गट प्रतिनिधी, अलका लहू थोरात फलोत्पादन महिला प्रतिनिधी, लता धोंडीभाउ मधे महिला मंडळ प्रतिनिधी, रंजना श्यामकांत ठाणगे महिला मंडळ प्रतिनिधी, प्रदयुम्न गुलाबराव करंजुले शेती प्रतिनिधी, विमल पांडूरंग कारखिले शेती महिला प्रतिनिधी, दामू विठठल झावरे शेती गट प्रतिनिधी

No comments:

Post a Comment