भातोडीत शिवसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 20, 2021

भातोडीत शिवसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 भातोडीत शिवसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गावोगावी शिवसंपर्क अभियान शिवसैनिक राबवितात. शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भातोडी येथे शिवसंपर्क अभियान राबविले.
यावेळी नागरदेवळे गटाचे जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, नगर तालुका पंचायत समिती सभापती संदीप गुंड, उपसभापती दिलीप पवार, माजी सभापती व पंचायत समिती सदस्य प्रवीण कोकाटे, उपतालुका प्रमुख निसार शेख, जिवाजी लगड, उपसरपंच राजू पटेल, अमोल कदम, अजिनाथ शिंदे, घनश्याम लबडे, बंडू गायकवाड, भाऊसाहेब धलपे, रियाज शेख, घनश्याम राऊत, गणेश गायकवाड, लांडगा पिंपळगावचे उपसरपंच योगेश लांडगे, पारगावचे ग्रामपंचायत सदस्य गणेश गुंड, प्रसाद पवार आदी उपस्थित होते.
झोडगे म्हणाले, शिवसंपर्क अभियान राज्यभर शिवसैनिक राबवित आहेत. या अभियानातून शिवसैनिकांच्या अडीअडचणी जाणवून घेणे, गावातील प्रश्नासंदर्भात चर्चा करणे यांसह संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे हा त्या मागचा हेतू आहे. यावेळी भगत, गुंड, कोकाटे आणि पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. अमोल कदम यांनी प्रास्ताविक केले.निसार शेख आणि आदिनाथ शिंदे यांनी झोडगे यांनी केलेल्या विकास कामाची माहिती दिली. अभियानात गावातील सर्व तरुण वर्ग सहभागी झाला होता. अशोक तरटे, विक्रम लबडे,सागर कदम, ज्ञानेश्वर घोलप, दादा कदम, कैलास गांगरडे, लतीफ मुलानी, अभिमान लबडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here