कोरोनाचे संकट दूर होऊन नगर शहर विकास पथावर राहिल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

कोरोनाचे संकट दूर होऊन नगर शहर विकास पथावर राहिल

 कोरोनाचे संकट दूर होऊन नगर शहर विकास पथावर राहिल

माळीवाडा येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात महापौरांच्या हस्ते महापूजा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज अवघा महाराष्ट्र हा विठ्ठलमय  झाला आहे,  पांडूरंगाने कोरोनांचे संकटे दूर करुन शहरात सुख-समृद्धी नांदू दे! अशी प्रार्थना आपण विठ्ठल चरणी केली आहे. नगरच्या महापौर पदाच्या माध्यमातून नगरकरांची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. श्री विशाल गणेश व पांडूरंगाच्या आशिर्वाने आपण ही जबाबदार यशस्वीपणे पार पाडू. नागरिकांना सोयी-सुविधा देण्याबरोबरच नगर शहराच्या वैभवात भर पडेल, असे प्रकल्प आणण्याचा आपला प्रयत्न राहिल. आज कोरोनामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे, अशा परिस्थितीत नागरिकांनी शासनाने घालून दिलेले नियमांचे पालन केल्यास कोरोनावर आपण मात करु शकतो. आज विठ्ठल चरणीही हीच प्रार्थना केली आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाचे संकट दूर होऊन नगर शहर विकास पथावर राहील, असे  प्रतिपादन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी केले.
आषाढी एकादशीनिमित्त माळीवाडा येथील शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर परिसरातील श्री संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल-रुख्मिणी यांची महापूजा  महापौर सौ.रोहिणी व संजय शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आली.  याप्रसंगी श्री विशाल देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, हरिश्चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, बापूसाहेब एकाडे, अर्जुनराव बोरुडे, दत्ता जाधव आदि उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, आज संपूर्ण शहर विठ्ठलमय झाले आहे. भाविकांनी विविध मंदिरात पूजा करुन आपली मनोकामना पूर्ण करण्याचे साकडे विठ्ठल-रुख्मिनीला घातले आहे. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथील श्री संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तीची पहाटेच विधीवत पूजा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर  विविध उपाय योजना केल्या असल्याचे अ‍ॅड.आगरकर यांनी केले. याप्रसंगी देवस्थानच्यावतीने महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment