ग्रामीण रुग्णालयांमधील कंत्राटी वाहनचालकांचे थकीत वेतन मिळण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

ग्रामीण रुग्णालयांमधील कंत्राटी वाहनचालकांचे थकीत वेतन मिळण्याची मागणी

 ग्रामीण रुग्णालयांमधील कंत्राटी वाहनचालकांचे थकीत वेतन मिळण्याची मागणी

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ग्रामीण रुग्णालय मधील सर्व कंत्राटी वाहन चालकांची थकित वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत अमित गांधी, वाहन चालक दीपक कांबळे, रोहित होडशीळ, कडूबाळ खरात, दत्तात्रय ठुबे, बाबासाहेब गोफने, विलास शिंदे, गुलाब शिवरकर, रुपेश घंगाळे, किशोर बनसोडे, दिगंबर मुखेकर, सचिन साळुंखे आदी उपस्थित होते.  
कंत्राटी वाहन चालक दि.1 एप्रिल 2021 पासून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांचे तोंडी आदेश व सेवा अभियंता अहमदनगर व वैद्यकीय अधीक्षक यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कंत्राटी वाहन चालक म्हणून आजपर्यंत 24 तास सेवा देण्याचे काम करीत आहेत सर्व कंत्राटी वाहनचालकांना विमा संरक्षण नसतानादेखील कोविंड रुग्णांची सेवा करीत आहोत व आम्हाला आजपर्यंत कामाचे वेतन मिळालेले नाही तसेच कोविड भत्ता सुद्धा मिळालेला नाही तरी आम्हा सर्व कंत्राटी 102 वाहनचालकांना समान काम समान वेतन नुसार थकित वेतन मिळावे त्याचप्रमाणे मागील ठेकेदाराकडून मागील वर्षामधील देखील काही वाहन चालकाचे वेतन मिळालेले नाही आम्ही सर्व कंत्राटी वाहन चालक 10 ते 15 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा करण्याचे काम करीत आहेत तरी आम्हा सर्व वाहन चालकांना 1 एप्रिल 2021 पासून थकलेले वेतन लवकरात लवकर मिळावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment