मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर हनुमानवाडी, भाळवणी रस्त्याचे आमदार विजयराव औटी यांच्या हस्ते भूमिपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर हनुमानवाडी, भाळवणी रस्त्याचे आमदार विजयराव औटी यांच्या हस्ते भूमिपूजन

 मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर हनुमानवाडी, भाळवणी रस्त्याचे आमदार विजयराव औटी यांच्या हस्ते भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः पारनेर येथील भाळवणी (दहावा मैल) महाराष्ट्र राज्याचे विधानसभा माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर, पंचायत समिती सभापती गणेशराव शेळके, जिल्हा शिवसेना उपप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले, युवा सेना तालुका प्रमुख नितीन शेळके, पंचायत समिती सदस्या सौ ताराबाई चौधरी,ढवळपुरी चे सरपंच राजेश भनगडे, उद्योजक पोपटराव चौधरी या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाळवणी गावात जवळपास  एक कोटी रुपयांचा निधी दिला माजी आमदार विजयराव औटी यांनी घालून दिलेली पंधरा वर्षाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचे सामर्थ्य आम्हाला दिल्याने त्या माध्यमातून आम्हाला तालुक्यात विकास कामे करता आली. माझा टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातच विकास न करतात संपूर्ण तालुक्यात विकासाची कामे मार्गी लावली गेल्या एक महिन्यापासून तुम्ही याचे साक्षीदार आहात. भूमिपूजन समारंभ प्रसंगी माजी आमदार विजयराव औटी म्हणाले की मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत मंजुर रस्त्यावर एशियन बँकेचे नियंत्रण आहे त्यामुळे या रस्त्याचे काम बँकेच्या नियंत्रणाखाली होणार असून रस्त्याचे काम दर्जेदार होणार आहे याची काळजी करू नका त्यामुळे तुमची जबाबदारी महत्त्वाची आहे कामात कोणतीही अडचण येऊ देऊ नका मी लोकशाही मानणारा आहे लोकशाही मध्ये पदे येतात जातात सत्तेची ताम्रपट घेऊन कोणीच आले नाही या देशात इंदिरा गांधी चा सुद्धा पराभव झाला. लोकशाही मध्ये सत्ता येते जाते त्यामुळे माझ्या हातून काही काम राहिले आहे का ते पूर्ण करावे. माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री असताना मी दिलेला शब्द पूर्ण होणार नाही असे मी ऐकून घेऊ शकत नाही माझा पराभव झाला आणि मी दाते सरांना बांधकाम समितीचे सभापती केले गणेश शेळके यांना दुसर्‍यांदा पंचायत समितीचे सभापती पद दिले तुमची अडचण दूर केली तालुक्याचा विकास थांबला नाही त्यामुळे सत्तेचा समतोल साधला गेला यावेळी भाळवणी चे सरपंच लिलाबाई रोहोकले, उपसरपंच संदीप ठुबे, ग्रामपंचायत सदस्य कोंडी भाऊ तरटे, भागा रोहोकले, ठकुबाई रोहोकले, सिताराम रोहोकले, मनीषा वांगुने, मंगल चेमटे, शांताबाई कपाळे, संदीप व्यवहारे, मा. चेअरमन गजा रोहोकले, मुरलीधर रोहोकले, माजी सरपंच बबन चेमटे, ठकचंद रोहोकले, बबन डावखर, राजू बाचकर, संतोष चेमटे, बबन वाबळे, राजू वाबळे, संपत वाबळे, गणपत रोहोकले, किरण बाचकर, मंजाबापू चेमटे, आप्पा दादा रोहोकले, दादू पटेकर, बाबासाहेब रोहोकले, बाळू नांगरे, मिराबाई वाबळे, सईबाई वाबळे, शांताबाई वाबळे, मनीषा मोळके, मनीषा रोहोकले, मंदा रोहोकले, दगडाबाई वाबळे, अलका भुजबळ, सविता रोहोकले, शैला रोहोकले, मंदा बाचकर, सविता भुजबळ, सुगंधाबाई भुजबळ, जाईबाई रोहोकले, यमुना रोहोकले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच संदीप ठुबे यांनी केले प्रस्तावना सरपंच लिलाबाई रोहोकले यांनी मांडली तर आभार तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी केले.

No comments:

Post a Comment