समाजसेवक अण्णा हजारे व तहसीलदार ज्योती देवरे यांचा कलेच्या माध्यमातून सन्मान ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

समाजसेवक अण्णा हजारे व तहसीलदार ज्योती देवरे यांचा कलेच्या माध्यमातून सन्मान !

 समाजसेवक अण्णा हजारे व तहसीलदार ज्योती देवरे यांचा कलेच्या माध्यमातून सन्मान !

कलाशिक्षक संतोष क्षिरसागर यांनी तयार केले व्यक्तिरेखा चित्र


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः वासुंदे गावचे सुपुत्र कलाक्षेत्रात उत्तम कार्य करत असलेले श्री भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थे मधील एक धडाडीचे शिक्षक  संतोष पांडुरंग क्षिरसागर सर यांनी आपल्या हस्तकौशल्याच्या माध्यमातून अनेक कलाकृती तयार केल्या आहेत. कलेची आवड असल्यामुळे नेहमीच काही तरी नवीन करण्याची उर्मी संतोष क्षीरसागर सर यांचा मध्ये असते.
दरम्यान संतोष क्षीरसागर सर  यांनी आपल्या अंगी असलेली कला जोपासत नेहमीच सामाजिक, वैचारिक विषयांनाही अतिशय महत्त्व दिले आहे.  कलेच्या माध्यमातून संतोष क्षीरसागर सर हेच समाज सेवा करत आहे हे वासुंदेकरांचे भूषणच आहे. क्षिरसागर सर यांचे हस्ताक्षर ही सुंदर असून डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या सुंदर अक्षरांमध्ये लिहून काढला व तो प्रकाशित केला आहे.
अलीकडेच संतोष क्षिरसागर सर यांनी आपल्या रेखाचित्राच्या माध्यमातून देशाचे भूषण व पारनेर तालुक्याचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, मा. आमदार स्व. वसंतराव झावरे पाटील यांचेही व्यक्ती रेखा चित्र तयार केले आहे. तसेच पारनेरच्या कार्यक्षम तहसीलदार   ज्योती’ताई देवरे मॅडम यांचा कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी त्यांचे ही एक व्यक्ति रेखाचित्र तयार केले आहे. अण्णा हजारे व ज्योती देवरे मॅडम यांचे दोन्ही व्यक्तिरेखा चित्र क्षीरसागर सर यांच्या हस्तकलेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. अतिशय अप्रतिम  दोन्ही व्यक्तिरेखा चित्र त्यांनी निर्माण केले आहे.  त्या दोन्ही व्यक्तीरेखा चित्रांमध्ये जीव  आणण्याचा प्रयत्न क्षीरसागर सर यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे व तहसीलदार ज्योतीताई देवरे मॅडम यांनी  हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाचे व कलेचे कौतुक केले आहे.
कलाशिक्षक क्षीरसागर सर यांच्यासोबत   पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब खिलारी, राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर शहराध्यक्ष संतोष  सोबले, सामाजिक कार्यकर्ते मोहन रोकडे,  पत्रकार गणेश जगदाळे आदी उपस्थित होते. सरांच्या या कामाची दखल घेऊन मा. उपाध्यक्ष जि.प. अहमदनगर सुजित झावरे पाटील यांनी ही विशेष असे कौतुक केले.

संतोष क्षिरसागर सर यांनी माझे तयार  केलेले व्यक्ती रेखाचित्र हे एक आदर्श कलेचा नमुना आहे. क्षिरसागर सर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक कलाकृती तयार केल्या त्यांचे काम हे  समाज व्यवस्थेला ताकद देणारे आहे.  त्यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केला हा ग्रंथ समाजातील तरूणांमध्ये आध्यात्मिक आवड निर्माण करण्याचे निश्चितच काम करील.
    - पद्मभूषण अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

क्षिरसागर सर यांनी माझे कोरोना काळातील कामाचे कौतुक आणि माझा सन्मान करण्यासाठी अप्रतिम असे माझे  व्यक्तिरेखा चित्र तयार केले ते पाहून मी भारावून गेले आहे. अतिशय उत्तम असं व्यक्तिरेखा चित्र त्यांनी तयार केलं त्यांच्या कलेचे त्यामधून दर्शन होते त्यांच्यासारखे  सामाजिक वैचारिक विचारसरणी असलेले कलाकार नक्कीच समाजव्यवस्थेला चांगल्या उंचीवर घेऊन जातील.
- ज्योती देवरे मॅडम, तहसीलदार, पारनेर

No comments:

Post a Comment