लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी सहकार क्षेत्रातील संतत्व प्राप्त केले ः उद्धव महाराज मंडलिक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 9, 2021

लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी सहकार क्षेत्रातील संतत्व प्राप्त केले ः उद्धव महाराज मंडलिक

 लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी सहकार क्षेत्रातील संतत्व प्राप्त केले ः उद्धव महाराज मंडलिक

लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे स्मृतीस ज्ञानेश्वर उद्योग समूहाची आदरांजली...


नेवासा प्रतिनिधी :--
स्वर्गीय मारुतराव घुले हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. साहेबांनी  सर्वांना पाठबळ दिले-सहकार्य केले. ज्ञानेश्वर कारखान्याची उभारणी करून अनेकांच्या चुली पेटविण्याचे काम त्यांनी केले.अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कर्ज देऊन, गोदाकाठ हिरवागार करण्याचे काम त्यांनी केले.
लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी सहकार क्षेत्रातील संतत्व प्राप्त केले आहे असे प्रतिपादन श्रीक्षेत्र नेवासा येथील तुकाराम महाराज मंदिराचे विश्वस्त  उध्दव महाराज मंडलीक यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांना 19 व्या पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे वतीने आदारंजली अर्पण करण्यात आली.
प्रारंभी श्रीक्षेत्र नेवासा येथिल  तुकाराम महाराज मंदिराचे विश्वस्त उद्धव महाराज मंडलिक,ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख, कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,संचालक माजी आमदार चंद्रशेखर  घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,अड.देसाई देशमुख,शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील, संचालक काकासाहेब नरवडे,विठ्ठलराव लंघे,शिवशंकर राजळे,युवा नेते उदयन गडाख,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे,अंकुश महाराज कादे,रामनाथ महाराज काळेगावकर आदींनी स्व.घुले पाटील यांचे स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त  शिवाजी महाराज देशमुख  म्हणाले,साहेबांनी समाजासाठी आपले जीवन व्यतीत केले.धरणग्रस्तांचे जीवन आनंदी करण्याचे काम त्यांनी केले. तळागाळातील माणसाला आधार देत सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची हातोटी होती. म्हणून ते जनतेचे मालक झाले. साहेब परोपकारी जीवन जगले.अनेकांचे संसार फुलविण्याचे काम त्यांनी केले.खांबासाठी मंदिर बांधण्याचे मोठे काम ज्यांनी केले त्या बन्सी महाराज तांबे यांचे मंदिर झाले पाहिजे यासाठी सर्वात प्रथम 51 हजार रुपयांची पहिली देणगी मारूतराव घुले पाटलांनी दिली.किशोर महाराज दिवटे (श्रीक्षेत्र आळंदी देवाची) यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी ज्ञानेश्वर माऊली पवार,मच्छिन्द्र महाराज भोसले,मुळा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काशिनाथ नवले, संचालक काकासाहेब शिंदे,पंडित भोसले,बबनराव भुसारी,जनार्दन कदम,शिवाजीराव दसपुते,दिलीपराव लांडे,अरुणराव लांडे,जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,दादासाहेब शेळके,नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, पंचायत सदस्य अजित मुरकुटे,संजय फडके,रामभाऊ जगताप,दिलीप पवार,हनुमंतराव वाकचौरे,सुरेश डिके,मच्छिन्द्र म्हस्के,बबनराव धस,शिवाजी गवळी,अनिल मडके,तुकाराम मिसाळ,नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे,अशोकराव मिसाळ, दादा गंडाळ,गणेश गव्हाणे,अशोक वायकर,शिवाजी कोलते,उत्तमराव वाबळे,संजय कोळगे, अरुण देशमुख, मच्छिन्द्र महाराज भोसले, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे,निकम सावकार,अ‍ॅड.अण्णासाहेब अंबाडे, एकनाथ भुजबळ,नंदकुमार पाटील,शिवाजीराव पाठक,पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी माणिकराव बुधवंत, बापूसाहेब फुंदे,उपअभियंता प्रवीण दहातोंडे,संजय घुले,काकासाहेब लबडे,भानुदास कावरे,भाऊसाहेब चौधरी,मोहनराव देशमुख,वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक डॉ.यशवंत गवळी, अशोक कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दिगंबर शिंदे,श्रीरंग हारदे,अमोल अभंग, युवक नेते सोमनाथ कचरे ,एकनाथ कावरे,डॉ.अशोकराव ढगे,एम.एम.शिंदे , कडूभाऊ दळवी, बाळासाहेब नवले,तुकाराम काळे आदी उपस्थित होते.
स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आलेल्यांचे थर्मल स्कॅनिंग करून सॅनिटायझर व मास्क देण्यात आले.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घ्यावी लागणारी सर्व ती खबरदारी यावेळी घेण्यात आली होती. दरवर्षी 8 जुलै रोजी लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे पुण्यस्मरण कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.मात्र यावर्षी कोरोना महामारीचे संकटामुळे कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करत सामाजिक अंतराची मर्यादा पाळून मर्यादित स्वरूपाचा कार्यक्रम झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here