बालकांसाठी (पीव्हीसी) न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन व अतिसार नियंत्रण पंधरवडा योजना राबविण्याचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

बालकांसाठी (पीव्हीसी) न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन व अतिसार नियंत्रण पंधरवडा योजना राबविण्याचा शुभारंभ

 बालकांसाठी (पीव्हीसी) न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन व अतिसार नियंत्रण पंधरवडा योजना राबविण्याचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्हा रुग्णालय ,जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विध्यमाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार्‍या दीड वयोवर्षांपासून ते पाच वर्ष पासूनच्या बालकांसाठी (पी. व्ही. सी. )न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्ह्यक्सीन व अतिसार नियंत्रण पंधरवडा योजना राबविण्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे चीफ एक्सिक्युटीव्ह औफिसर राजेंद्र क्षिरसागर यांच्या हस्ते धनवंन्तरी देवतेची पूजा करून व फीत कापून करण्यात आली.यावेळी जिल्ह्यातील पहिली लस कु रायशा तनवानी या  अडीच वर्षाच्या बालिकेस डॉ. क्षीरसागर  यांनी दिली  सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एका छोटेखानी सभारंभात यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .संदीप सांगळे ,सिव्हिल सर्जन डॉ सुनील पोखर्णा,अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ . भागवत दहिफळे ,निवासी वैधकीय अधिकारी डॉ सुवर्णमाला बांगर ,अधिसेविका गायकवाड , .श्रीमती माया बनकर,छाया जाधव पी. एच. एन.पंकज काळे ,श्रीकांत व निलेश तांबे, संदीप काळे व  परिचारिका उपस्थित होते  डॉ. सुनील पोखर्णा यांनी या वेळी स्वागत केले व जिल्ह्यातील सर्व शासकीय संस्थे मध्ये हि लस मोफत दिली जाणार असून पहिला डोस झाल्यानंतर साडेतीन   महिन्यानंतर दुसरा डोस व नऊ महिन्यानंतर बूस्टर डोस बालकांना दिला जाणार आहे.  हि योजना शासनाच्या नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत राबविली जाणार आहे असे सांगितले. डॉ. क्षीरसागर यांनी बोलताना सांगितले कि  जिह्यातील सर्व नागरिकांनी  आपल्या बालकांना हि लस टोचून घ्यावी या व्यतिरिक्त सर्व जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने घरोघरी जाऊन पाच वर्षाच्या बालकांना ओ .आर.  एस.चे एक पाकीट व डायरिया ( जुलाब )  होत असलेल्या बालकांना झिंक या चौदा गोळ्यांचे पाकिटही मोफत दिले जाणार आहे तरी सर्वांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. पंकज काळे यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment