साहित्यिक प्रा. सुदर्शन धस यांना पुणे विद्यापीठाची पी.एच.डी.
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः येथील कवी व साहित्यिक प्रा. सुदर्शन चंद्रशेखर धस यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मराठी विषयातील पीएच.डी. ही पदवी (डॉक्टरेट) नुकतीच जाहीर झाली.
नगर महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्रातून श्री. धस यांनी 1975 नंतरच्या निवडक मराठी कवितेतून साकार झालेले कृषी जीवनाचे स्वरूप : एक चिकित्सक अभ्यास या विषयावरील प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. प्रा.डॉ.मच्छिंद्र मालुंजकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
प्रा.सुदर्शन धस हे रयत शिक्षण संस्थेमध्ये , न्यू इंग्लिश स्कूल हंगे या ठिकाणी अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा भावशलाका हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. सदर यशाबद्दल त्यांचे अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रजनीश बार्नबस , महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. सुधाकर शेलार , प्रा.डॉ. शिरीष लांडगे , प्रा.डॉ. संदीप सांगळे , प्रा.डॉ. लक्ष्मीकांत एळवंडे , प्रा.डॉ. प्रकाश सूर्यवंशी , प्रा.डॉ. पोपट सिनारे यांनी तसेच साहित्य , संस्कृती व शैक्षणिक क्षेत्रातील इतर अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment