हिंगणगाव-निंबळक येथे अन्नधान्य व किराणा किट वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

हिंगणगाव-निंबळक येथे अन्नधान्य व किराणा किट वाटप

 हिंगणगाव-निंबळक येथे अन्नधान्य व किराणा किट वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी प्रकल्प अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजना अंतर्गत अन्नधान्य व किराणा वाटप कार्यक्रम हिंगणगाव व निंबळक येथे घेण्यात आला.या अगोदर प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावर रोख स्वरूपात दोन हजार रुपये अनुदान जमा करण्यात आले.
 पंचायत समितीचे उपसभापती डॉ.दिलीप पवार यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना दोन हजार किंमतीचे अन्नधान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच  आबासाहेब सोनवणे  हे होते. याप्रसंगी आदिवासी आश्रम शाळेचे शिक्षक,राजूर प्रकल्प कार्यालयाचे लिपिक भालेराव,  पांडुरंग सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, सुनिल सोनवणे, अर्जुन आडसूळ, मच्छिंद्र मोरे, निसार पठाण, मयूर सुंबे, गोविंद ढगे, केशव सोनवणे, अब्दुल सय्यद,बाबूमिया सय्यद, मिरसाहेब सय्यद उपस्थित होते. तसेच निंबळक येथे माजी सरपंच साधना शरद लामखडे यांच्या विशेष प्रयत्नातून  25 आदिवासी कुटुंबांना (खावटी) धान्य व किराणा  वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती उपसभापती डॉक्टर दिलीप पवार, माजी  जि. प. सदस्य माधवराव कोतकर,  बि.डी. कोतकर, राजेंद्र कोतकर, दत्ता कोतकर, अर्जुन कोतकर यांच्यासह  गोरक्षनाथ कोतकर, शरद लामखडे, सुभाष खेसे, भाऊ जर्‍हाड, दत्तात्रय दिवटे, भानुदास कोतकर, जालिंदर कोतकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment