नागरिकांनी सहशुल्क लस घेऊन कुटुंबांना सुरक्षित ठेवावे- महापौर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 24, 2021

नागरिकांनी सहशुल्क लस घेऊन कुटुंबांना सुरक्षित ठेवावे- महापौर.

 नागरिकांनी सहशुल्क लस घेऊन कुटुंबांना सुरक्षित ठेवावे- महापौर.

8 हॉस्पिटलला लसीकरणासाठी परवानगी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सावेडी येथील मॅक्सकेअर, टिळक रोड येथील सिद्धिविनायक, सिनारे हॉस्पीटल, नागापूर, लाईफ लाईन हॉस्पीटल तारकपूर, वहाडणे हॉस्पीटल, लालटाकी,  पाटील हॉस्पीटल, कोठी, स्टेशन रोड, हराळ हॉस्पीटल, कल्याण रोड, जयश्री नर्सिग होम, चाणक्य चौक या हॉस्पिटलला “लसीकरण केंद्र” म्हणून मान्यता देण्यात आली असून या रुग्णालयामार्फत लसीचे शुल्क नागरिकांनाकडून आकारून लस देण्यात येईल. तसेच लसीकरण करणार्‍यांचा अहवाल खाजगी रूग्णालय यांनी मनपाकडे वेळोवेळी देणे बंधनकारक आहे. तरी नागरिकांनी सहशुल्क लसीकरणाचा लाभ घ्यावा व कोवीड पासून स्वत:ला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे असे मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी अहवान आहे.
खाजगी रूग्णालयास कोवीड लसीकरण करणे बाबतचे मनपा मार्फत शहरातील रूग्णालयांना लस देणेबाबतचे प्रमाणपत्र मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी दिले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.शासनाच्या निर्देशानुसार खाजगी कोवीड लसीकरण केंद्रास शहरातील आठ रूग्णालयांना परवानगी देण्यात आलेली आहे. ही रुग्णालये कंपनीकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्ये लस खरेदी करणार आहे असेही महापौरांनी सांगितले. यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.श्री.सागर बोरूडे, नगरसेवक मा.श्री.सचिन शिंदे, मा.श्री.गणेश कवडे, माजी शहर प्रमुख मा.श्री.संभाजी कदम, वैद्यकिय आरोग्याधिकारी डॉ.श्री.सतिष राजूरकर, श्री.राजू नराल,श्री.किशोर कानडे आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.श्री.सागर बोरूडे यांनी सांगितले की, मनपा मार्फत आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरू असून नागरिक लसीकरणासाठी गर्दी करतात काही नागरिक वयस्कर असतात  मा.शासनाच्या निर्देशानुसार आठ ठिकाणी लसीकरण केंद्रास परवानगी दिलेली आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घेण्यात यावा. त्यानुसार खालील हॉस्पीटलची नांवे दिलेली आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here