आयुक्तांना देणार वेड्या बाभळीचे काटेरी बुके. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

आयुक्तांना देणार वेड्या बाभळीचे काटेरी बुके.

 आयुक्तांना देणार वेड्या बाभळीचे काटेरी बुके.

अतिक्रमण हटविण्यासाठी पिपल्स हेल्पलाइनचं अनोखं आंदोलन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वतःच्या कर्तव्याबद्दल भक्ति, ज्ञान व भान यासंदर्भात महापालिका उदासीन आहे. महापालिकेचे अधिकारी सार्वजनिक रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटविण्यास अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे महापालिकेचा कारभार टंगळमंगळ स्ाूरू आहे. महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने 13 ऑगस्ट रोजी आयुक्तांना वेड्याबाभळीचा काटेरी बुके देऊन अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी पिपल्स हेल्पलाइन च्या वतीने स्वकार्य भग्याबा असं अनोखं आंदोलन करून आयुक्तांना अतिक्रमण काढले नाही याचा जाब विचारणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अँड कारभारी गवळी यांनी दिली.
 श्री अँड गवळी म्हणाले की, प्रेमदान हडकोच्या पश्चिमेला लागून असलेल्या दक्षिण-उत्तर रस्त्यावर अनाधिकृत गाळे बांधून सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. एप्रिल 2019 मध्ये महापालिकेने हे अतिक्रमण  बेकायदेशीर विनापरवाना झाले असल्याचे जाहीर करुन पाडण्याचा हुकूम केला होता. दोन वर्षे उलटून देखील हे अतिक्रमण पाडण्यासाठी कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने मनपा आयुक्तांनी कर्तव्याचे पालन केले नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दि.13 ऑगस्ट रोजी आयुक्तांना वेड्याबाभळीचा काटेरी बुके देऊन अतिक्रमण का काढले नसल्याचा? जाब आम्ही विचारणार आहोत.
महापालिका हद्दीतील सावेडी सं.नं. 109 मध्ये मूळ जमीन मालक वसंत धनाजी गायकवाड, मालती वसंत गायकवाड, विनायक वसंत गायकवाड, कमलाकर वसंत गायकवाड, धनंजय वसंत गायकवाड यांनी लेआऊट प्लॅन मंजूर करून घेतले होते. आणि त्या वेळच्या अमदनगर नगरपरिषदेने ठराव क्रमांक 497 दिनांक 30 जानेवारी 1993 अन्वये लेआऊट प्लॅन मंजूर केलेला आहे. त्यामध्ये लेआऊट प्लॅन नुसार मंजूर झालेला अंतर्गत नऊ मीटर किंवा सहा मीटर पर्यंत चे सर्व रस्ते मूळ जमीन मालकाने त्या वेळच्या अहमदनगर नगरपरिषदेला 18 ऑक्टोबर 2001 चे नोंदवलेल्या खरेदीखताने दिलेले आहेत. अशा वेळेस सदरील प्रेमदान हडको पश्चिमेकडे सार्वजनिक रस्ता झालेला होता व आहे. परंतु किरण कमलाकर गायकवाड वगैरे तीन लोकांनी या रस्त्याच्या उत्तर बाजूला आणि आणि प्रेमदान ते प्रोफेसर कॉलनी या रस्त्यावर उत्तर बाजूला तीन गाळे बेकायदेशीर रीतीने बांधलेले आहेत. या संदर्भात पीपल्स हेल्पलाईन संघटनेने 2018 मध्ये तक्रार केली होती. त्यावर अतिक्रमण करणार्या लोकांना नोटीस देऊन 1 एप्रिल 2019 च्या महापालिकेच्या आदेशानुसार वरील तीन गाळ्यांचे बांधकाम बेकायदेशीर विनापरवाना आठ मीटर रुंदीच्या रस्त्यावर बांधलेले असे जाहीर करून, पाडण्याचा हुकूम झालेला आहे. परंतु गेल्या दोन वर्षात महापालिकेने याबाबत काही एक सकारात्मक कारवाई केली नाही. हुकूमाला कोणत्याही कोर्टाने मनाई केली नसताना सुद्धा महापालिकेने आपले कर्तव्य पार पाडले नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment