महापालिकेत स्वबळावर सत्ता, शहरात शिवसेनेचा आमदार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार.- भाऊ कोरेगावकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

महापालिकेत स्वबळावर सत्ता, शहरात शिवसेनेचा आमदार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार.- भाऊ कोरेगावकर

 महापालिकेत स्वबळावर सत्ता, शहरात शिवसेनेचा आमदार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार.- भाऊ कोरेगावकर

शिव संवाद अभियान सांगता समारंभ संपन्न.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरच्या विकास आराखड्यासहित महापौर व सर्व नगरसेवक पदाधिकार्‍यांना मुंबईत बैठकसाठी बोलावले आहे.मोठ्या प्रमाणात शहरात विकास कामे करण्यासाठी पुढील दोन वर्ष अफाट कामे शिवसेनेच्या माध्यमातून नगर शहरात केली जातील जेणे करून नागरिकांना दिलासा मीळेल आणि यापुढे आगामी काळात महापालिकेत शिवसेनेची एकहाती स्वबळावर सत्ता तर येईलच पण दिवसरात्र काम करून शहरात शिवसेनेचा आमदार विजयी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या वतीने शिवसंवाद अभियानचे आयोजन करण्यात आले होते. नगर शिवसेनेच्या वतीने हे अभियान राभवून जास्तीत जास्त नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न शहरप्रमुख दिलीप सातपुते, सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी केला. या अभियानाची सांगता नक्षत्र मंगल कार्यालय येथे झाली. याप्रसंगी कोरगावकर बोलत होते.
याप्रसंगी कोरगावकर पुढे म्हणाले की, नगरमध्ये शिवसेना रुजवणण्याचे काम स्व.अनिल राठोड यांनी केले. नगरच्या जनतेचे शिवसेनेशी घराच्या लोकांसारखे घट नाते आहे. कारण शिवसेनेचे उपनेते स्व. अनिल राठोड यांनी त्यांच्या कडे कोणीही अडचणी, समस्या घेवून आलेला व्यक्ती कधीच रिकाम्या हाती गेला नाही. त्याचे काम पूर्णच होयचे. नगर शहराला विकासाचा मार्गावर पुढे आणण्याचे काम फक्त आणि फक्त शिवसेनाच करू शकते. अनिल राठोड यांनी जनतेचे आणि शिवसेनेचे प्रेमाचे नाते निर्माण केले. स्वताचा मनात कायम स्व.बाळासाहेब ठाकरेंचे विचार ठेवून जनतेला कायम रक्षण, न्याय, त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी कायम अग्रेसर राहिले. म्हणून अहोरात्र प्रयत्न करून नगर शहरात शिवसेनेचा आमदार करणार. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचा सुरवातीला स्व.अनिल राठोड व महाराष्ट्रातील पूरग्रस्त ठिकाणी मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लाटेत स्व.अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पाच हजार लोकांना भोजन मोफत देण्यात येत होते.शिवसेनेच्या माध्यमातून दोन्ही कोरोना लाटेमध्ये हाजारो लोकांसाठी मोफत कोविड उपचार घेण्यासाठी यंत्रणा सज्ज केली. नगर शहरातील असंख लोकांना त्याचा लाभ मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदावर बसल्यापासून महाराष्ट्रच्या जनतेला रेशनवरून मोफत धान्य, शिवभोजन थाळी, शेतकर्‍यासाठी कर्ज माफी अशा अनेक जनहिताच्या योजना राभवला. या योजनेंचा प्रचार व प्रसार शिवसैनिकांनी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोचावा.असे सांगितले.
याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर रोहिणी शेंडगे, उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, अनिल बोरुडे, शाम नळकांडे, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, गणेश कवडे, ,अमोल येवले, विजय पठारे, सचिन शिंदे, संतोष गेनाप्पा, अशोक दहिफळे, संग्राम शेळके संदेश कार्ले, शरद झोडगे, प्रवीण मोकाटे, राजेंद्र भगत, दिपक कावळे, शाम सोनवणे, मृणाल भिंगारदिवे, सुमित धेंड, महेश शेळके, स्मिता आष्टेकर, निर्मला धूपधरे सुरेश श्रीरसागर, रंगनाथ सांगळे, अरुण शिंदे, दिलीप कानडे, राम इंगले, नंदू पेंडभाजे, अर्जुन दातरंग, अर्जुन पठारे, अर्जुन बोरुडे, डॉ.श्रीकांतचेमटे, रावसाहेब भाकरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment