जनआधार सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

जनआधार सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन

 जनआधार सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन

परिचर महिलांना कोविड काळातील प्रोत्साहन भत्ता व किमान वेतन वाढ (मानधन) व निवृत्ती पेन्शन योजना लागू करण्याची मागणी  

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः प्रशासनातील आजवरचा सर्वात दुर्लक्षित आणि वंचित घटक म्हणजे अर्धवेळ स्त्री परिचारिका या कोरोना काळाच्या  महामारीत, सरकारी आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारी आरोग्य विभागात साफसफाई तसेच पडेल ती कामे करणारी हक्काची बाई म्हणजे अर्धवेळ परिचारिका होय.केवळ नावाने अर्धवेळ असणारी ही परिचारिका सुमारे 7 ते 8 तास रोज काम करते परंतु तिचा पगार हा मागील तीस वर्षांपूर्वी 50 रुपये महिना ते आज मात्र 3 हजार रुपये महिना एवढाच वाढलेला आहे त्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने 100 रुपये आणि राज्य सरकारच्या वतीने,2900/-- रुपये असे मानधन मिळते.या महागाईच्या काळात 100 रुपये रोजाने कुणी काम करणार दुसरं मिळणार नाही.परंतु आज ना उद्या या मायबाप सरकारला जाग येईल आणि आपला उद्धार होईल या धोरणाने ते आजपर्यंत रात्रंदिवस राब-राब,राबत,आहेत.  कुठल्याही मोठ्या इमारतीच्या पायाचा प्रत्येक दगड जसा महत्वाचा असतो,त्याचप्रमाणे अर्धवेळ परिचारिका या शासकीय आरोग्य यंत्रणेत काम करत आहेत.त्यांची आजची अवस्था ही आई जेवू घालीना, आणि बाप भीक मागू देईना अशी झालेली आहे
सदर प्रमुख मागण्या सिंदखेड राजा,(जिल्हा बुलढाणा) येथील झढङ पदावर काम करत असताना सर्प दौंशाने मृत पावलेल्या गीता बुरकुल यांच्या मुलास शासनाने भरगोस मदत करावी तसेच मागील वर्षीच्या कोरोना काळात देखील अनेक परिचर महिलांना प्रोत्साहन भत्ता,अद्याप ही मिळालेला नाही.आणि आजही त्या,या कोरोना महामारीच्या  काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत या परिचर महिलांना यावर्षीचा तसेच मागील वर्षीचाही, प्रोत्साहन भत्ता  देण्याची उपाययोजना करावी  तसेच,आपण किमान वेतनानूसार त्यांना लवकरात लवकर पगारवाढ करावी व यापुढील सर्व वेतन (मानधन)हे त्यांना ऑनलाइन पध्दतीने देण्याची व्यवस्था करावी व हे सर्व आपल्या कडून होत नसल्यास निदान आमचे प्रश्न मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री ,यांचे कडे तातडीने मांडावेत अशी मागणी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने करून जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये सर्व अर्धवेळ परिचर महिलां समोरील अमरण उपोषण करताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत राज्य सचिव अमित गांधी, जिल्हा सचिव बाळासाहेब केदारे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दीपक गुगळे, संतोष उदमले, कल्पनाताई महाडिक, सुरेखा जाधव, कुमुदिनी वंजारे, शालिनीताई लांडे, जयश्री कांबळे, उषा केदारे, प्रतिभा सोनवणे, नंदा शिंदे, योगेश सोनवणे, गणेश गायकवाड, अमोल गायकवाड, गणेश निमसे, किरण गाढवे, सिद्धांत आंधळे, किरण जावळे, उमेश करपे,अजित वांढेकर, बंडू दहातोंडे,अजय शिंदे आदीसह परिचारिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment