निघोज ग्रामस्थ व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनच्यावतीने कमीटी अध्यक्षांचा सत्कार ..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 9, 2021

निघोज ग्रामस्थ व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनच्यावतीने कमीटी अध्यक्षांचा सत्कार ..!

 निघोज ग्रामस्थ व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनच्यावतीने कमीटी अध्यक्षांचा सत्कार ..!

आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  जनतेचे पाठबळ व आशिर्वाद मिळाल्याने आमदार निलेश लंके यांनी विकासकामांमध्ये कोनत्याही प्रकारची उनीव न ठेवता जनतेच्या आरोग्याची काळजी घेत देशात नावलौकिक मिळविला ही मतदार संघाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन आत्मा कमीटीचे तालुका अध्यक्ष ड.राहुल झावरे यांनी व्यक्त केले आहे.निघोज ग्रामपंचायत, ग्रामस्थ व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन यांच्या वतीने ड. राहुल झावरे यांची पारनेर तालुका आत्मा कमीटीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल तसेच वीज सल्लागार समितीच्या तालुका अध्यक्षपदी चंद्रभान ठुबे, सदस्यपदी सोमनाथ वरखडे, पारनेर तालुका दुष्काळ निवारण समितीच्या अध्यक्षपदी लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निघोज येथील युवानेते ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके पाटील यांच्या नियुक्ती बद्दल संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउलीशेठ वरखडे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष ईधाटे व युवानेते राहुल वराळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी ड.झावरे बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राज्याचे माहिती व प्रसारण खात्याचे अध्यक्ष जितेश सरडे , देवीभोयरे गावचे सरपंच विठ्ठलराव सरडे, तुषार सोनावळे, रुपेश ढवण, मुस्लिम समाजाचे नेते बशिरभाई तांबोळी, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके,रमिज शेख, अविनाश वराळ,साजिद तांबोळी, प्रविण लंके, प्रफुल्ल लंके, मनोहर खोसे,सुखदेव ढवळे आदी यावेळी उपस्थित होते. ड झावरे यावेळी म्हणाले आमदार लंके यांनी राजकारण न करता समाजकारण माध्यमातून मतदारसंघाचा विकास केला आहे.कोव्हिड रुण्गांची सेवा कशाप्रकारे केली.याचा जगात नावलौकिक झाला.निघोज ग्रामपंचायत माध्यमातून होणार्‍या विकासकामाना पाठबळ देण्याची जबाबदारी आमची आहे.सचिनपाटील व त्यांचे सहकारी चांगल्या पद्धतीने विकासकामे करीत असून कधीही कोनतेही काम घेउन या विकासकामे होणारच अशी ग्वाही यावेळी ड.झावरे यांनी दिली. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी ड.झावरे व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक केले.आमदार लंके यांच्या माध्यमातून मोठी विकासकामे सुरू असून जनतेसाठी रात्रंदिवस काम करणारे आमदार म्हणून लंके यांचा नावलौकिक असल्याचे गौरवोद्गार यावेळी वराळ यांनी व्यक्त करीत सत्कार स्विकारण्यासाठी आलेल्या मान्यवरांना धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here