मायक्रो फायनान्स बँकांची सक्तीची वसुली बंद करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 9, 2021

मायक्रो फायनान्स बँकांची सक्तीची वसुली बंद करा

 मायक्रो फायनान्स बँकांची सक्तीची वसुली बंद करा

बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफीची नेवासा काँग्रेसची शासनाकडे मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करा व मायक्रोफायनान्स बँकांकडून होणारी वसूली तातडीने थांबवा  त्यासाठी सरकारी अनुदान द्या अशी मागणी नेवासा काँग्रेसने शासनाकडे निवेदनाद्वारे  केली.
तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये बचतगट सक्रिय आहेत , बचतगटातील सर्व महिला या कष्टकरी असून यांचे हातावर पोट चालते या महिला बचत गटांनी बंधन, कुट्टी,राष्ट्रीयकृत बँका,  अशा  मायक्रोफायनान्स बँकांकडून दहा हजार ते एक लाखापर्यंतचे कर्ज घेतले आहे या कर्जाची व्याजासह नियमितपणे परतफेड करत असताना कोरोनाच्या दुसर्‍या लाटीमुळे जवळ जवळ चार महिने लोकडाऊन घोषित करण्यात आला त्यामुळे या बचत गटाकडून सुरु असणारे व्यवसाय बंद करण्यात आले ते आजपर्यंत बंद आहे या परिस्थितीत या बचतगटातील महिलांची आर्थिक कोंडी झाली, उत्पन्न ठप्प झाले , कुटुंब उघड्यावर आले अशा बिकट परिस्थितीमध्ये या मायक्रो फायनान्स बँकांनी  पठाणी वसुलीचा धडाका लावला आहे, या महिलांना अर्वाच्य भाषेचा वापर वसूली अधिकारी करतात, या जाचाला गटातील सर्वच महिला वैतागलेल्या आहेत ,
नेवासा तालुका काँग्रेस कमिटीने पुढे येऊन या महिलांना धीर देत पाठीशी उभे राहण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
आज नेवासा तहसील कार्यालयात नेवासा काँग्रेस कमिटीसह तालुक्यातील बचत गटातील महिलानी निवेदनाद्वारे संपूर्ण कर्जमाफीची मागणी शासनाकडे केली.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे,जिल्हा काँग्रेसचे  सुदामराव कदम, जिल्ह्याउपाध्यक्ष कार्लस साठे, काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल भोगे, विजय गायकवाड,  मीडिया प्रमुख सचिन बोर्डे,तालुका संघटक संदीप मोटे,रमेश जाधव,  शहराध्यक्ष रंजन जाधव,शहर उपाध्यक्ष मुसाभाई बागवान,युवक काँग्रेसचे आकाश धनवटे, एनएसयुआई चे सौरभ कसावणे , गटप्रमुख संतोषभाऊ साळवे ,महिला काँग्रेसच्या शोभाताई पातारे, मनीषा उमाप, जयश्री मिसाळ, शहर काँग्रेसचे अय्याज बागवान, चंद्रकांत पवार, अनिल बर्डे, आदीसह काँग्रेस कार्यकर्ते व बचतगट महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here