व्यापार्‍यास खोदकाम करताना सापडला सोने-चांदीने भरलेला हंडा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

व्यापार्‍यास खोदकाम करताना सापडला सोने-चांदीने भरलेला हंडा.

 व्यापार्‍यास खोदकाम करताना सापडला सोने-चांदीने भरलेला हंडा.

हंड्यात फक्त चांदी सापडल्याची कबुली.. गुप्तधनाचे गुढ वाढले..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर मधील एका प्रतिष्ठित व्यापार्‍याच्या घरात घराचे नूतनीकरण करण्याचे काम चालू असताना सोन्या-चांदीचे दागिने भरलेला हंडा सापडला. घरात खोदकाम करणारे मजूर व व्यापारी यांच्यामध्ये देण्याघेण्याचा वाद सुरू झाला आणि या गुप्त धनाची बातमी पोलिसांपर्यंत पोहचली. शहर पोलिसांनी या व्यापार्‍यांची चौकशी सुरू केली असून या व्यापार्‍याने या हंड्यात चांदी असल्याचे कळविले आहे. सोने लंपास करून फक्त चांदी सापडल्याची कबुली या व्यापार्‍यांने दिली असल्याने या गुप्तधनाचे गुढ वाढले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात व्यापार्‍यांचे घराचे खोदकाम सुरु असताना खोदकाम करणारांना एक हंडा सापडला त्यांनी तो मालकास सांगीतला त्यांनी तो माल ताब्यात घेतला असुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरातत्व विभाग ते गुप्तधन ताब्यात घेणार असल्याचे समजते.
याबाबत समजलेली माहीती अशी की, बेलापुर गावात जुनी व मोठी बाजारपेठ होती. त्या काळी धन हे सोन्याच्या स्वरुपात जमा करुन जमिनीत पुरुन ठेवले जात असत. गावात असे अनेक जुने वाडे आहेत अशाच एका व्यापार्‍यांच्या जागेत खोदकाम काही मजुर करत होते त्यांना अचानक खोदताना काहीतरी वस्तू असल्याचे जाणवले त्यांनी ती वस्तू बाहेर काढली असता एक हंडा निघाला त्यात बरेच सोने चांदी भरलेले होते तो हांडा व्यापार्‍यांने ताब्यात घेतला. या बाबत खोदाकाम करणारांना काही अमिष दाखविण्यात आले होते परंतु ते पुर्ण न झाल्यामुळे गुप्तधनाचे बिंग फुटले अन या गुप्तधनाचा गावभर नव्हे जिल्हाभर बोभाटा झाला
व्यापार्‍यांने चांदी सापडली असल्याचा जिल्हाधिकारी यांना कळविले असुन काही चांदी घेवुन संबधीत नगरला गेले आहेत परतु जिल्हाधिकारी हे पुरातत्व विभागाला आदेश करतील त्या नंतर महसुल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचा पंचनामा करुन ते धन महसुलच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे एका अधिकार्‍यांने सांगीतले आहे.
बेलापूरात गुप्तधन सापडल्याची चर्चा जिल्हाभर पसरली आहे त्यात फक्त चांदी असल्याचाच दावा करण्यात येत आहे ही घटना घडून तेरा चौदा दिवस झाले आहे. मग इतक्या दिवस सर्वा जण गप्प का होते याची सखोल चौकशी झाल्यानंतर बरेच काही मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे या गुप्त धनाची चर्चा झाल्यानंतर पोलीसही सावध झाले असुन त्यांनीही चौकशी सुरु केली आहे.

No comments:

Post a Comment