विस्कळीत पाणीपुरवठ्याची आ. संग्राम जगतापांकडून दखल; घेतली तातडीची बैठक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, July 14, 2021

विस्कळीत पाणीपुरवठ्याची आ. संग्राम जगतापांकडून दखल; घेतली तातडीची बैठक.

 विस्कळीत पाणीपुरवठ्याची आ. संग्राम जगतापांकडून दखल; घेतली तातडीची बैठक.

मुळा धरण, विळद पंपींग स्टेशनवर वारंवार विद्युत पुरवठा खंडित.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः येत्या काही दिवसांपासून पावसामुळे मुळा धरण व विळद येथील पंपिंग स्टेशन मध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. वीज पुरवठा सुरळीत होऊन नगरकरांना पाणी मिळण्यास अडचण होऊ नये म्हणून आ. संग्राम जगताप यांनी आयुक्त, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, जल अभियंता यांची बैठक घेवून विळद येथे “एक्सप्रेस फिडर” बसविण्याची सूचना केली.
आ.श्री.संग्राम जगताप यांनी एमएसईबीचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री सांगळे यांचेकडे मुळाधरण व विळद येथे लवकरात लवकर एक्सप्रेस फिडर बसविण्याच्या सुचना केल्या. मनपाने तुमच्याकडे 2 कोटी 40 लाख रूपये भरले असून या कामाला लवकरात लवकर सुरूवात करा. असे आदेश दिले आहेत. मुळा धरण व विळद येथे विज मंडळाकडून होणारा विज पुरवठा दररोज खंडीत होत आहे. काही मिनीटांसाठी वीज पुरवठा जरी खंडीत झाला तरी मुळानगर, विळद व नागापूर येथील कार्यरत पंपीग स्टेशन येथून होणारा पाणी उपसा बंद पडतो त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सुमारे 4-5 तासाचा अवधी लागतो. त्यामुळे शहरातील वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या व्यवस्थित भरता येत नाही. पर्यायाने शहरात नियमीत व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांना मनपा अधिकारी व कर्मचारी यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. खंडीत वीज पुरवठयामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता शहर पाणी पुरवठा योजनेकरितेचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून एमएसईबी विभागाचे स्वतंत्र सक्षम पथक सुसज्ज ठेवणे व आपत्कालीन परिस्थितीमध्ये मनपाशी समन्वय ठेवून तातडीने समस्याचे निवारण करून वीज पुरवठा सुरळीत ठेवणे बाबत उपाय योजना कराव्यात. वीज वितरण कंपनीने दुरूस्तीच्या कामासाठी शटडाऊन दिल्यानंतरही खंडीत विज पुरवठयाची मालिका सुरूच आहे. यासावळया गोंधळामुळे नागरिकांची पाण्यावाचून हाल होत आहे. तरी पुढील काळात वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा व शहरातील विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठयाचे नियोजन करून नागरिकांना पाणी पुरवठा करावा. अशी नागरिकांची मागणी आहे.
मळा धरण व विळद पंपिग स्टेशन येथे गेल्या 20 दिवसा पासून दररोज एमएसईबीचा खंडीत होत असलेला विज पुरवठयामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होवून नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. अनेक दिवसांचा कालावधी उलटल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी हाल होत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे; वीज पुरवठा व विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत होण्याची गरज आहे.
यावेळी मा.आयुक्त श्री.शंकर गोरे, एमएसईबीचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री.सांगळे, उपायुक्त श्री.यशवंत डांगे, जल अभियंता श्री.परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री.रोहिदास सातपुते, श्री.रोहोकले, आदीसह अधिकारी वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here