पारनेर, संगमनेर, कर्जतने चिंता वाढविली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

पारनेर, संगमनेर, कर्जतने चिंता वाढविली.

 पारनेर, संगमनेर, कर्जतने चिंता वाढविली.

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढतोय...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः संगमनेर कर्जत व विशेषतः पारनेर तालुक्यात कोरांना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मागील काही आठवड्यापासून कमी होत असलेल्या कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये हळू हळू वाढ होऊ लागली आहे. आज अहमनगर जिल्ह्यात एकुण 590 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पारनेर, संगमनेर, कर्जत, नगर शहर व इतर जिल्हा येथे कोरोना बाधितांची संख्या शुक्रवारच्या तुलनेत वाढली आहे. पारनेर तालुक्याचा आजचा आकडा 111 वर पोहोचला असून त्या खालोखाल संगमनेर 99, कर्जत 62, इतर जिल्हा 34, नगर शहर 28 असा क्रम लागतो. पारनेर तालुक्याच्या आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पारनेरमधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही गावांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर केला असून कोरोना तपासण्यामध्ये वाढ केली आहे. यामुळे पारनेर तालुक्याचा आकडा वाढतांना दिसतो आहे.
आज आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 35, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 192 तर अँटीजेन चाचणीत 363 असे 590 कोरोना बाधित आढळून आले. आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 111, संगमनेर 99, कर्जत 62, नगर ग्रामीण 42, शेवगाव 41, इतर जिल्हा 34, नगर शहर 28, पाथर्डी 25, अकोले 24, जामखेड 23, श्रीगोंदा 21, राहुरी 20, कोपरगाव 19, नेवासा 16, श्रीरामपूर 14, राहाता 10, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले. नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नागरिकांनी नियमाचे पालन केले तर कोरोनाची आकडेवारी आटोक्यात येवून आकडेवारी शुन्यावर येऊ शकणार आहे.

No comments:

Post a Comment