शिवसेना जिल्हा उपप्रमुखांसह सहा जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

शिवसेना जिल्हा उपप्रमुखांसह सहा जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल.

 शिवसेना जिल्हा उपप्रमुखांसह सहा जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल.

छिंदम-जाधव संघर्ष पराकोटीला..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव या दोघांमध्ये जुने वाद आहेत. या वादाची परीनीती एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत गेली आहे. दोन दिवसांपूर्वी छिंदम बंधूंच्या विरोधात चोरी व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच आता शिवसेना जिल्हा उपप्रमुखांसह सहा जणांवर खंडणीचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
गाळा बांधकाम करायचे असेल प्रत्येक गाळ्यामागे पाच हजार याप्रमाणे 12 गाळ्यांचा 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत एकास खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह सहा जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. विजय रमेश सामलेटी (रा. तोफखाना) यांनी ही फिर्याद दिली आहे.
गिरीश जाधव यांच्यासह त्यांचा भाऊ राजेश जाधव, बाळासाहेब जाधव, चेतन जाधव, भागीरथ बोडखे, प्रतिक बोडखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 जुलै ते 15 जुलै 2021 दरम्यान ही घटना घडली आहे. विजय सामलेटी यांच्यासह माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम व त्यांच्या ओळखीचे इतर असे काही जण दिल्लीगेट येथे सामलेटी यांना गाळा भाड्याने घ्यायचा असल्याने तो गाळा पाहण्यासाठी गेले होते. यावेळी गिरीश जाधवसह त्याचे इतर भाऊ व साथीदार त्याठिकाणी आले. हे गाळे येथे कसे उभे केले, तू मला विचारल्याशिवाय मिळकतीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे नाही. तुला काही बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्यामागे पाच हजार याप्रमाणे 12 गाळ्याचे 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल. माझ्यावतीने आमचा कोणीही माणूस येईल आणि हप्ता घेऊन जाईल. त्याची पूर्तता अगोदरच करून ठेवायची, असा दम दिला. मी सांगितलेला सल्ला ऐकणार नसाल तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुझा कायमचा बंदोबस्त करू, अशी धमकी त्यांनी श्रीपाद छिंदम यांना दिली. त्यानुसार तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंढे हे करीत आहे.

No comments:

Post a Comment