कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गाईंची सुटका. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गाईंची सुटका.

 कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गाईंची सुटका.

श्रीरामपूर पोलिसांकडून 2 जणांवर गुन्हा दाखल.


श्रीरामपूर -
शहरातील टिळक नगर मधील संविधान कॉलनीत कत्तलीसाठी 5 गाईंना बांधून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 2 जणांवर प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाई करून 1,25,000 रु. किमतीच्या पाच गायींची सुटका केली आहे.
काल डीवायएसपी संदीप मिटके यांना श्रीरामपुर शहरातील  टिळक नगर येथील संविधान कॉलनी येथे एका घराचे लगत गोवंश जातीचे प्राण्यांना कत्तल करण्यासाठी बांधून ठेवण्यात आले आहे अशी खात्रीशीर  गोपनीय बातमी मिळाल्याने टिळक नगर येथील सविधान कॉलनी येथे एका घराचे लगत अधिकारी व अंमलदार यांचे पथक व दोन पंचासह छापा टाकून एकूण 1,25,000/- रुपये किमतीचे पाच गाईंची सुटका करण्यात आली आहे. छाप्याचा दोन पंचांसमक्ष  पंचनामा करून आरोपी करण सुरेश कांबळे रा.टिळक नगर तालुका श्रीरामपूर, फिरोज मुसा कुरेशी रा वाड नंबर श्रीरामपूर, यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोका नितीन सुभाष चव्हाण नेमणूक उपविभागीय कार्यालय श्रीरामपूर यांचे फिर्यादीवरून गुन्हा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम1995 चे सुधारित कायदा2015 चे कलम 5, 5(ल)9 सर्व प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम1960 चे कलम11(ल)(क्ष) प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. ही कारवाई मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली, डीवायएसपी संदीप मिटके, पीएसआय समाधान सुरवाडे, पो. हे.कॉ. साबदे,  पो.ना शेलार,  राशिनकर, पो.कॉ.  रवींद्र  बोडखे, नितीन चव्हाण, रवींद्र माळी, बाळू गुंजाळ आदींनी केली.

No comments:

Post a Comment