आमदार निलेश लंके स्वीकारणार होतकरू आणि गरजू ’स्पर्धा परीक्षार्थींचे’ पालकत्व - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

आमदार निलेश लंके स्वीकारणार होतकरू आणि गरजू ’स्पर्धा परीक्षार्थींचे’ पालकत्व

 आमदार निलेश लंके स्वीकारणार होतकरू आणि गरजू ’स्पर्धा परीक्षार्थींचे’ पालकत्व  

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः
 जनहितासाठी दिवसातले चोवीस तास कार्यरत असणारे लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण राज्यात ओळखले जाणारे आणि आपल्या धडाडीच्या कार्यशैलीमुळे विशेषतः बहुसंख्य तरुणांनी त्यांना आपले आयडॉल मानले आहे. आमदार निलेश लंके हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा रोजचा संघर्ष त्यांना ज्ञात आहे. याच जाणिवेतून त्यांनी शिक्षण आणि आरोग्य आणि पायाभूत प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा संकल्प त्यांनी सोडलेला आहे यातूनच पुढील वाटचाल करत असताना हेच आपले जीवितकार्य म्हणून त्यांनी निवडलेले आहे. आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक युवक-युवती पदवीचे शिक्षण घेत असताना आणि पदवी पूर्ण झालेवर प्रशासनात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. बहुतांश विद्यार्थी क्षमता असूनही केवळ आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पूर्ण क्षमतेने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांत त्यांना यश मिळवता येत नाही. यातून एका कुटुंबाचा भविष्यातील आधार आणि प्रशासनातील कर्तृत्वान अधिकारी आपण गमावून बसतो हि खंत आमदार निलेश लंके यांना कायम लागून राहिली होती. कोरोनाच्या उद्रेकाच्या काळात त्यांनी उभारलेल्या प्रचंड कामामध्ये आणि एकंदरीत त्या काळात शासन स्तरावर ’प्रशासकीय अधिकार्‍यांचे’ व प्रशासनाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले हते. याच जाणिवेतून त्यांनी आपल्या पारनेर मतदार संघातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या प्रशिक्षण क्लासचा पूर्ण खर्च ते उचलणार आहेत. यासाठी त्यांनी पुणे येथील नामवंत आणि यशस्वी निकालाची परंपरा असणार्‍या ’द इन्फिनिटी अकॅडेमी’च्या सहकार्याने ’स्पर्धा परीक्षा विद्यार्थी दत्तक योजना’ हि अभिनव संकल्पना राबिवली आहे यातून  हुशार मात्र गरजू आणि आर्थिक दुर्बल असणार्‍या विद्यार्थ्यांची निवडप्रक्रियेतून निवड करून त्यांना पुणे येथे संपूर्ण एक वर्षाचा पूर्णवेळचा क्लास मोफत उपलब्ध करून देणार आहेत. द इन्फिनिटी अकॅडेमीचे पुणे येथील तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांच्या टीम मार्फत स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. प्रत्येक विषयाला स्वतंत्र एक मार्गदर्शक असतील, विषयाच्या परिपूर्ण दरमहा चालू घडामोडींचे मॅगेझीन आणि उपलब्ध करून देणार आहेत. लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज घेतल्या जातील  शिवाय अभिरूप मुलाखत पॅनल द्वारे मुलाखतीची विशेष तयारी करून घेतली जाईल. प्रशासनातील कार्यरत असणारे व अनुभवी अधिकार्‍याचे विशेष मार्गदर्शन आणि विद्यार्थी संवाद देखील आयोजित केले जाणार आहेत. ’स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ’प्रशासकीय सेवेत करियर घडविण्यासाठी हि एक संधी आमदार निलेश लंके यांनी उपलब्ध करून दिली असून पारनेर मतदार संघातील व परिसरातील ग्रामीण व शहरी भागातील हुशार, होतकरू, गरजू आणि मेहनती विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.
’स्पर्धा परीक्षा विद्यार्थी दत्तक योजनेद्वारे चझडउ : राज्यसेवा आणि झडख-डढख-डज (कम्बाईन) हे दोन्ही कोर्स पुणे येथे विद्यार्थ्यांना पुण्यातील नामवंत असलेल्या ’द इन्फिनिटी अकॅडेमी’मध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत यामध्ये फक्त विद्यार्थ्यांनी निवास आणि भोजनाची सोय मात्र स्वतः करावयाची आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपली नाव नोंदणी 25 जुलै पर्यंत गुगल फॉर्म लिंक - हीींिीं://षेीाी.सश्रश/वइ9डछुलगर्गीं4र49षर यांवर करावी व अधिक मार्गदर्शनसाठी संपर्क - 9665210675 यांवर करा. मा.आमदार निलेश लंके यांच्या दूरदृष्टीतून सिद्ध झालेला आणि पारनेर मतदारसंघातील ’समाजभान’ असणारे विद्यार्थी प्रशासनात यावेत यासाठी विद्यार्थ्यांच्या ध्येयसिद्धीस बळ देणारा उपक्रम आहे.

No comments:

Post a Comment