पारनेर तालुक्यातील शिवविचारांच्या आदर्शांसाठी शिवस्मारक- आ. निलेश लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, July 14, 2021

पारनेर तालुक्यातील शिवविचारांच्या आदर्शांसाठी शिवस्मारक- आ. निलेश लंके

 पारनेर तालुक्यातील शिवविचारांच्या आदर्शांसाठी शिवस्मारक- आ. निलेश लंके

हंगात लोकवर्गणीतून 50 लाख रुपयांचा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

शिवस्मारकासाठी मुस्लिम बांधवांच्या वतीने 11 हजारांची मदत
  तालुक्यातील हंगात येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून या शिवस्मारकासाठी पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक डॉ मुदस्सर सय्यद यांनी पारनेर तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने 11 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने या 1 शिवस्मारकासाठी ही मदत दिल्याने हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः आजच्या समाजाला व समाज व्यवस्थेला शिवविचारांची फार मोठी गरज असुन या राष्ट्र पुरूषांचे पुतळ्याबरोबर त्यांचे गुण अंगीकृत केले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे.तर दुसरीकडे पारनेर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गावात शिवाजी महाराजांच्या विचार पुढील पिढीसाठी आदर्श ठेवण्यासाठी शिवस्मारक उभारण्याचा मानस आमदार निलेश लंके यांनी बोलून दाखवला आहे.
पारनेर तालुक्यातील हंगा येथे लोक वर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक उभारले जाणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे यासाठी शासनाच्या ज्या आवश्यक परवानगी त्या घेण्यात येतील .त्या परवानगी नंतर यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ज्या ज्या समिती कार्यकर्त्यांना मिळाल्या आहेत पदांमुळे माणसाला ओळख नाही तर माणसामुळे पदांची ओळख निर्माण झाली आहे असेही आमदार निलेश लंके म्हणाले आहे.
हंगात 50 लाख रुपये खर्च करून शिवस्मारक व्यायाम शाळा व जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी हे होते.यावेळी जि.प.सदस्या राणीताई लंके बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड दादा शिंदेे माजी सभापती सुदाम पवार कारभारी पोटघन मेजर युवानेतेतेेेे जितेश सरडे  बाळासाहेब कावरे सुवर्णा धाडगे सरपंंच विक्रम कळमकर तालुकाध्यक्ष पुनमताई मुंगसे सरपंच बाळासाहेब दळवी उपसरपंच वनिता शिंदे राजेंद्र शिंदे संजय लाकुडझोडे श्रीकांत चौरे चंद्रकांत मोढवे बाळासाहेब लंके सोमनाथ वरखडे दौलत गांगड चंद्रकांत ठुबेे बाळासाहेब ब्राम्हणे प्रकाश दळवी भाऊसाहेब भोगाडे सर संदिप मगर नगरसेवक मुदस्सर सज्ञय्यद किसन गंधाडे सचिन पठारे उमाताई बोरूडे कल्पना औटी संदीप रोहोकले सर्व ग्रामपंचायत सदस्य चेअरमन व्हा.चेअरमन ग्रामस्थ यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की कोणाचा बारा कसे वाजवायचे हे मला माहित आहे बर्हिजी नाईकांची हंगा ही जन्मभूमी आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गावांमध्ये गरज होती.मोठ्या गावात मुख्य चौकात अशी शिवस्मारक उभारणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांची समाजाला गरज असुन या समाज व्यवस्थेला विचारांची ही गरज आहे.त्यामुळे हंगा गावात ही वास्तु उभी राहिल्यानंतर पारनेर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गावात हे अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा मानस आमदार निलेश लंके यांनी बोलून दाखविला आहे.
जातेगाव पुणेवाडी व राळेगण सिद्धी नंतर पठार भागातील पाण्यासाठी कान्हुर पठार पाणी योजना राबविण्यात येणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरीब जनतेला आधार देण्याचे काम केले पाहिजे असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रकांत मोढवे व आभार भाऊसाहेब नगरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here