साईनगरीत रक्तदान शिबिराचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

साईनगरीत रक्तदान शिबिराचे आयोजन

 साईनगरीत रक्तदान शिबिराचे आयोजन

पहिल्या टप्प्यात 66 रक्तदात्यांचे रक्तदान, महिलांचाही सहभाग


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः साईबाबांची शिकवण व तब्बल सव्वाशे वर्षांचा रूग्णसेवेचा वारसा लाभलेल्या साईनगरीत आज पहिल्या टप्प्यात 66 रक्तदात्यांनी रक्तदान केले. लोकमतचे संस्थापक तथा जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती निमीत्ताने साईनगरीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब, शिर्डी तसेच राहाता, रूई, सावलेविहिर, येथील तरुणाईने रक्तदानासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे रक्तदानात महिलांनीही सहभाग नोंदवला. साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांच्या हस्ते साईबाबा व स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पुजन करून तसेच शिर्डी माझे पंढरपुर आरतीने शिबीराचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी पोलीस उपअधिक्षक संजय सातव, तहसिलदार कुंदन हिरे, पोलीस निरीक्षक प्रविणकुमार लोखंडे, वाहतुक निरीक्षक नारायण न्याहालदे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, उपसंचालक डॉ. योगेश गेठे, वैद्यकीय अधिक्षीका डॉ. सुनीता कडू, अभय शेळके, रविंद्र गोंदकर, सचिन तांबे, सुजीत गोंदकर, सचिन चौगुले, सुरेश आरणे, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पारख, शहराध्यक्ष कमलेश लोढा, सचिव निलेश गंगवाल, सहसचिव निलेश संकलेचा, उपाध्यक्ष संजय लोढा, महावीर संचेती, भुषण लोढा, धीरज लोढा, राहात्याचे जिल्हा सचिव नेमिचंद लोढा, शहराध्यक्ष पंकज मुथा, सचिव पारस पिपाडा, रूईचे सामाजिक कार्यकर्ते पंकज लोढा, सावळेविहीर मनोज कोठारी, रोटरीचे अध्यक्ष रविकीरण डाके, सचिव आकाश सोनार, डॉ. गुंजाळ, अभयकुमार दुनाखे आदींची यावेळी प्रमुख उपस्थीती होती.
साईसंस्थानच्या साईनाथ रक्तपेढीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरासाठी रक्तपेढीचे डॉ. सुर्यकांत पाटील, डॉ. मैथिली पितांबरे, मिलींदा आराक, चंद्रकांत लुटे, विठ्ठल शिरसाठ, सागर भगत, अशोक सातभाई, विजया निर्मळ, माया खंडीझोड, दिपाली झाळके, लिना गमे, सुनील गागरे, लक्ष्मण धुमसे, दिलीप जगदाळे, सचीन सापते, गोरख नवले यांनी परिश्रम घेतले. साईनगरीतील रक्तदाते- कमलेश लोढा, प्रमोद आहेर, दस्तगीर सलीम सय्यद, शुभम कांबळे, अजिंक्य कांबळे, कार्तिक राऊत, चणाबास नागलगावे, शरद राऊत, सौरभ जैन, प्रसाद बिरासदार, संजय सुघनचंद लोढा, संजय सुरजमल लोढा, नरेंद्र लोढा, रविंद्र डाके, आकाश सोनार, विजय शिंदे, अनुराग फटांगरे, सागर मालवे, संकेत लोढा, अरिहंत लोढा, आदीत्य लोढा, गणेश नेवल, साईनाथ लांबोळे, राजेंद्र नारंग, धीरज लोढा, सोमनाथ भराटे, भुषण लोढा, घनश्याम दोडीया, प्रविण पटेल, गितेश बाफना, फारूक शेख, सौरभ विश्वास, बबलु रॉय, प्रमोद गोंदकर, महेश पवार, मुकूंद पाटील, निलेश संकलेचा, मयुर औताडे, सागर गुढघे, दिगंबर कोते, हर्षल, विनोद वैद्य, गणेश डांगे, विशाल चौहाण, सुशांत, विनय मेवत, सुनील कांबळे, लहानु काळोखे, सोमनाथ बागल, दत्ता वैद्य, विलास लासुरे, महेश बनकर, संदेश पिपाडा, मनोज कोठारी, आनंद भंडारी, प्रसाद वेद, नरेशकुमार सोनवणे, प्रकाश आभाळे. महिला रक्तदाते - अंजली तांबे, सौदामिनी चौधरी, छाया दिगंबर कोते, स्वाती गंगवाल, रिंकु कासलीवाल, सोनिका लोढा, मितीका दोडीया आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना साईसंस्थानकडून चहा-बिस्कीटे, रोटरी क्लबच्या वतीने मास्क तर सिझन चॉईस मॉल तर्फे पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. दुसर्‍या टप्प्यात 15 जुलै रोजी महसुल, पोलीस, नगरपंचायत, पंचायत समिती, होमगार्ड, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना रक्तदान करणार आहे.

No comments:

Post a Comment