पत्रकार दातीर हत्याप्रकरणात व्यापारी गावडे सहआरोपी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 1, 2021

पत्रकार दातीर हत्याप्रकरणात व्यापारी गावडे सहआरोपी.

 पत्रकार दातीर हत्याप्रकरणात व्यापारी गावडे सहआरोपी.


राहुरी -
पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील आरोपी कान्हू मोरे यास राहुरीतील प्रतिष्ठित व्यापारी अनिल गावडे यांनी आर्थिक मदत केल्याचे तपासामध्ये समोर आल्यानंतर अनिल गावडे यांना सह आरोपी करून राहुरी पोलिसांनी कलम 212 लावून न्यायालयात सविस्तर रिपोर्ट सादर केला आहे. पोलिसांवरील राजकीय दबाव आल्यावर गावडे यांना पोलीस सह आरोपी करणार नाहीत अशी चर्चा राहुरी परिसरात होत असताना पोलिसांनी गावडे यांना सहआरोपी केल्याने खळबळ उडाली आहे.
राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास  डीवायएसपी संदीप मिटके श्रीरामपुर यांचेकडे वर्ग होताच त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे यास नेवासा फाटा येथून तर दुसरा आरोपी अक्षय कुलथे यास उत्तरप्रदेश येथून शिताफीने अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here