मग निर्बंधांचा फास का? आज.. शहरात कोरोनाचे 16च रुग्ण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 1, 2021

मग निर्बंधांचा फास का? आज.. शहरात कोरोनाचे 16च रुग्ण.

 मग निर्बंधांचा फास का? आज.. शहरात कोरोनाचे 16च रुग्ण.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज 1 जुलै.. आज गेल्या 24 तासात मनपा हद्दीमध्ये कोरोनाचे 16च रुग्ण आढळले. नगर शहरात रुग्ण संख्या घटली असताना जिल्हाधिकारी यांनी निर्बंध का लागू केले आहेत? तिसरी लाट येण्याची शक्यता ही आरोग्य तज्ञांनी फेटाळली असताना प्रशासनाने लागू केलेले निर्बंध अनाठायी व सर्वसामान्य नागरिक ,व्यापारी, दुकानदारांना अडचणीचे ठरणार आहेत.
चोवीस तासात जिल्ह्यात 487  नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 16 बाधितांची भर पडली आहे.
24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे - संगमनेर -28, अकोले - 3 श्रीरामपूर-3, राहुरी - 36, नगर शहर मनपा -16, पारनेर - 56, पाथर्डी - 65, नगर ग्रामीण -30, नेवासा - 26, कर्जत - 13, राहाता - 37, श्रीगोंदा - 62, कोपरगाव -18, शेवगाव - 33, जामखेड - 33, भिंगार छावणी मंडळ -3, इतर जिल्हा - 3, मिलिटरी हॉस्पिटल -2, इतर राज्य - 0 जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 22, खासगी प्रयोगशाळेत 205 तर अँटीजेन चाचणीत एकूण 260 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment