शरद पवार सुसंस्कृत नेतृत्व, त्यांचेवर खालच्या पातळीवरील केलेली टीका खपवून घेणार नाही. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 1, 2021

शरद पवार सुसंस्कृत नेतृत्व, त्यांचेवर खालच्या पातळीवरील केलेली टीका खपवून घेणार नाही.

 शरद पवार सुसंस्कृत नेतृत्व, त्यांचेवर खालच्या पातळीवरील केलेली टीका खपवून घेणार नाही.

आ. निलेश लंकेचा भाजपा आमदार पडळकरांना इशारा;


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खालच्या शब्दात केली. ‘रात गेली हिबेशात, पोरगं नाही नशिबात’, अशा शब्दात त्यांनी पवारांवर हल्ला चढवला. पवारांच्या पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी एकामागोमाग एक शाब्दिक वार केले. तसंच सगळे जण पवारांना मोठा नेता मानत असतील पण मी मानायला तयार नाही, असंही पडळकर म्हणाले. पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरल्याने राष्ट्रवादीचे नेते सध्या पडळकरांना तुटून पडले आहेत. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेतली जाणार नाही, असा उघड इशाराच पडळकरांना दिला आहे. शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर खालच्या शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं असल्याचं सांगत अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेणार नाही, असा इशाराच पडळकरांना दिला आहे.
माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझं शरद पवारांना आव्हान आहे की त्यांनी सांगावं, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचं हे कोणत्या कलमात लिहलं आहे, असा हल्लाबोल आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल सोलापुर येथे केला होता. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे. दगडफेकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. शरद पवार हे देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर अशा शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं आहे. महाराष्ट्राची भूमी ही महिलांचा मानसन्मान करणारी भूमी असून अश्याप्रकारे वक्तव्य करणं हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. पडळकरांच्या वक्तव्याचा मी निषेध करत करतो. इथून पुढे बोलताना त्यांनी काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही, असं लंके यांनी म्हटलंय.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here