माती परीक्षणानुसारच खत व्यवस्थापन करावे ः दौंड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 3, 2021

माती परीक्षणानुसारच खत व्यवस्थापन करावे ः दौंड

 माती परीक्षणानुसारच खत व्यवस्थापन करावे ः दौंड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पाथर्डी ः कृषी विभागामार्फत दिनांक 21 जून 2021 ते 1 जुलै 2021 या कालावधीत तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर व कृषी अधिकारी रामदास मडके यांचे मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुंगूसवाडे येथे कापूस या पिकाविषयी ची शेतीशाळा आयोजित केली होती.
यावेळी ज्ञानेश्वर दौंड कृषी साहाय्यक यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. पिकांना खत देण्यापूर्वी मृद आरोग्य पत्रिकेतील निर्देशानुसार आवश्यक तेवढेच खते द्यावीत रासायनिक खतांचा अति वापर करू नये दहा टक्के रासायनिक खताच्या बचतीचे आवाहन यावेळी दौंड यांनी केले.रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करावा तसेच ताग, ढेंच्या इ.हिरवळीच्या खतांचा वापर करावा .प्रकाश गायके कृषी सहाय्यक यांनी प्रास्ताविक केले तर शेतकर्‍यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here