फुले, शाहू आंबेडकरी विचारांचा वारसदार होण्याचा माझा प्रयत्न ः खा. संभाजीराजे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

फुले, शाहू आंबेडकरी विचारांचा वारसदार होण्याचा माझा प्रयत्न ः खा. संभाजीराजे.

फुले, शाहू आंबेडकरी विचारांचा वारसदार होण्याचा माझा प्रयत्न ः खा. संभाजीराजे.

खा. संभाजी राजांचे निवारा बालगृहातील अनाथ मुलांसोबत स्नेहभोजन.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव हे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार असल्यामुळेच त्यांनी मोहा सारख्या छोट्याशा माळ रानावर समता भूमी मध्ये निवारा बालगृहाची स्थापना करून भटके विमुक्त समाजातील निराधार, वंचित, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली,  असे प्रतिपादन खा. छत्रपती संभाजी राजे यांनी केले.
ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह येथे खा. छत्रपती संभाजी राजे यांनी शुक्रवारी दि. 2 जुलै रोजी दु. 3 वा. सदिच्छा भेट दिली.  तसेच निवारा बालगृहातील अनाथ मुला मुलींसोबत स्नेहभोजन घेतले. यावेळी निवारा बालगृहाच्या वतीने शाल, पुष्पहार व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवारा बालगृहाचे संस्थापक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव, संचालक बापु ओहोळ, प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत, प्रा. मधुकर आबा राळेभात, करण गायकर, रघुनाथ चित्रे पाटील, नगरसेवक अमित जाधव, अंकुश कदम, विनोद साबळे पाटील, धनंजय जाधव, विलास पांगारकर, विश्वनाथ वाघ, प्रमोद जाधव, अवधूत पवार, प्रशांत कुंजीर, जितेंद्र कोंढरे आदी मान्यवर विचारपिठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना खा. संभाजी राजे भोसले म्हणाले की, आम्ही समाजाचे काही देणे लागतो. म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मी माझ्या खासदार निधीतून निवारा बालगृहाच्या ग्रंथालय उभारणीसाठी 10 लाख रुपयांचा निधी देत आहे. मी इथे बहुजन समाजाला जोडण्यासाठी आलो आहे. समस्थ बहुजन समाज एकसंघ राहिला पाहिजे. ज्या शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिले. अशा महाराजांच्या विचारांचे वारसदार होण्याचा माझा प्रयत्न आहे. आमच्या राजांनी आम्हाला जे संस्कार दिले. त्या संस्काराच्या शिदोरीवर त्यांचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. व खर्‍या अर्थाने फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे पाईक होण्याचा आम्ही प्रयन्त करीत आहोत.
अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गाव कुसाबाहेर पालात राहणार्‍या भटक्या विमुक्त समाजातील 18 पगड जातील आपली आडनावे देऊन त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या समतेचा विचार पेरणार्‍या राजर्षी शाहू महाराजांचे वंशज खा. संभाजी राजे यांचे पाय आज समता भूमीला लागले. त्यामुळे समस्त भटका विमुक्त समाज धन्य झाला आहे.
खा. छत्रपती संभाजी राजे यांचे समता भूमीत आगमन होताच 11 तोफांची सलामी देऊन त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. संभाजी राजेंच्या हस्ते निवारा बालगृहाच्या प्रांगणात वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी निवारा बालगृहातील मुलांसोबत स्नेहभोजन घेतले.
निवारा बालगृहाच्या वतीने तरडगावच्या सरपंच संगीता केसकर, व लोकाधिकार आंदोलनाच्या महिला जिल्हाध्यक्ष द्वारका पवार, काजोरी पवार यांनी संभाजी राजांचे औक्षण केले. प्रारंभी प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. तुकाराम शिंदे, गीता बर्डे, वैष्णवी शिंदे, काजल पवार यांनी स्वागतगीत सादर केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजिनाथ केसकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास अरुण डोळस, विशाल जाधव, मच्छीन्द्र जाधव, भीमराव चव्हाण, सोमनाथ भैलुमे, काकासाहेब शेळके, नंदकुमार गाडे, चंद्रकांत नेटके, प्रा. विजय कांबळे, प्रा. दादा समुद्र, महादेव भैलूमे, आतिष पारवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर भांगरे, वैजिनाथ केसकर, संगीता केसकर, संतोष चव्हाण, सविता शिंदे, तुकाराम शिंदे, राजू शिंदे, बबलू मुळे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment