ओ.बी.सी.हक्कासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे : शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 3, 2021

ओ.बी.सी.हक्कासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे : शिंदे

 ओ.बी.सी.हक्कासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे : शिंदे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेवजी जाणकर यांनी ओ.बी.सी.आरक्षणाबाबत,एक दिवसीय आरक्षण बचाव अंदोलन छेडले असुन, याबाबत निर्णय जाहीर न केल्यास,तसेच जोपर्यंत आरक्षण स्थगिती उठवली जात नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेवु नये, असे सांगितल्याने, याबाबत दि.4/रोजी राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी जेलभरो अंदो लनं होणार असल्याचे, जाणकारांच्या आदेशानुसार, अहमदनगर जिल्हाअध्यक्ष नानाभाऊ जुंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाअधिकारी कार्यालयाच्या समोर, कोरोनाबाबतीत सर्व सुचनांचे पालन करुन,एकदिवसीय बैठे अंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे नेवासे तालुकाअध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी दिली.                                                    
याबाबत असे की, राज्य व केंद्र सरकारकडून ओ.बी.सी. समाजाच्या हक्काबाबत हनन करण्यात आले असून,या संदर्भात जाणकरांनी याअगोदर आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास राज्यात कुठल्याच स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका,तसेच राज्यसरकारने ओ.बी.सी. आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबींच्या पुर्ततेसाठी काम सुरु करावे.याबाबतची अनुभव लिखित माहिती तातडीने जमा करून न्यायप्रविष्टेकडे सादर करावी.यासंदर्भात उद्या रविवारी राज्यभर याबाबत बैठेअंदोलन तसेच प्रसंगी जेलभरो अंदोलनं होणार असल्याने तालुक्यातील सर्वच रासप कार्येकर्तेयांनी अंदोलनात सहभागी व्हावे, असे तालुकाअध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.                              
याबाबत, जिल्हाअधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी,तालु क्यातील पक्षाचे शिर्डी लोकसभाअध्यक्ष संभाजी लोंढें, मार्गदर्शक संतोष काळे सर, उपाअध्यक्ष शिवाजी सुपनर, युवकआघाडीचे सचिन देवकाते, विशाल माकोणे,सचिव गोरख होडगर,पक्षाचे नेते तुकाराम बाचकर,महेन्द्र नजन, ह.भ.प. सोनवणे महाराज, श्रीराम देशमुख, शनैशवर आयनर राजेंद्र बाचकर, नवनाथ गोयकर, तसेच इतरपदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित रहाणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी  सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here