पारनेर विद्युत मंडळाच्या समिती अध्यक्षपदी ठुबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

पारनेर विद्युत मंडळाच्या समिती अध्यक्षपदी ठुबे

 पारनेर विद्युत मंडळाच्या समिती अध्यक्षपदी ठुबे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तालुकास्तरीय विविध समित्यांची निवड जाहीर केली असून राज्य विद्युत मंडळ तालुका सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत ठुबे यांची नियुक्ती आली आहे. चंद्रकांत ठुबे हे कान्हुर पठारचे रहिवासी असून ते कोरठण खंडोबा देवस्थानचे विश्वस्त पण आहेत.
एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला अध्यक्ष म्हणून संधी दिली असून आमदार नीलेश लंके यांनी मनाचा मोठेपणा पुन्हा दाखविता असल्याची चर्चा तालुक्यात रंगु लागती आहे. हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकान्यांना यासंबंधीचे पत्र  नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन न्याय दिला असताना दुसरीकडे जिल्हा पातळीवर काम करणार्‍या शिवसेना नेत्यांनी स्वतःला पदे घेतल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
महावितरणच्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून चंद्रभान शंकर ठुबे तर अशासकीय सदस्य म्हणून आमदार नीलेश ज्ञानदेव लंके, सोमनाथ दौलत वरखडे, संभाजी हरिभाऊ नरसाळे, संपत देवराम वाळुंज, शिवाजी आप्पा मोरे, सत्यम श्रीपत निमसे, रामदास हनुमंत भोसले, उत्तम दत्तात्रय पठारे या सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment