श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद घेण्याऐवजी ठाणे अंमलदारांनी मारहाण केली ः कोठारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद घेण्याऐवजी ठाणे अंमलदारांनी मारहाण केली ः कोठारे

 श्रीगोंदा पोलिसांत फिर्याद घेण्याऐवजी ठाणे अंमलदारांनी मारहाण केली ः कोठारे

कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण चालू.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा येथील बेलवंडी कोठार येथील  दत्तात्रय तुळशीराम कोठारे, संतोष दत्तात्रय कोठारे, राधिका संतोष  कोठारे, सुभाष कोठारे, शोभा नवले यांच्या गट नंबर 32 शेतामध्ये बोलावून घेतले व धनराज उर्फ धनंजय मारुती कोठारे, मारुती कोठारे, सविता कोठारे व आणखी दोन अनोळखी यांनी गवताचे कारण दाखवून  शिवीगाळ करून मारहाण केली. व जीवे मारण्याची धमकी दिली. व आम्ही श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यास गेलो असता ते म्हणाले की आमची सुन गीता लाड ही श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचार आहेत आमच्या विरुद्ध कारवाई होणार नाही अशी धमकी दिली.  
त्यानंतर आम्ही श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो असता तक्रार घेण्यास नकार दिला व नंतर मी व मुलगा संतोष यांच्यावर  स्वतंत्र  अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला त्यावेळी ठाणे अंमलदार यांनी कोरोना कायदा नियम मोडून आम्हाला हुकूमशाही व मोगल शाही प्रमाणे वागणूक देऊन अधिकाराचा दुरुपयोग केला. व माझा मुलगा संतोष याला सर्व समक्ष कारण नसताना ठाणे अंमलदार रोहिदास झुंजार यांनी मारहाण केली त्यावेळी माझी मुलगी व सून यांनी निष्पाप माणसाला मारू नका तर या महिलांनाही ठाणे अंमलदार रोहिदास झुंजार यांचे हाताचे फटके बसले शेवटी मी व माझे दोन मुले एक मुलगी व सून यांना जेल शेजारी जाळीत अटक करून बाहेरून कडी लावली व मुलगा संतोष याच्या दोन स्वतंत्र नावाने अदखलपात्र गुन्हा दाखल केला. सुन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी असल्याने आम्हाला मारहाण करून आमची फिर्याद घेतली नाही व ठाणे अंमलदार यांनी मारहाण केल्यानंतर आमची अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला हा कोणता न्याय असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून पोलीस कर्मचारी गीता लाड व ठाणे अंमलदार रोहिदास झुंजार व धनंजय कोठारे, मारुती कोठारे, सविता कोठारे या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले यावेळी दत्तात्रय कोठारे संतोष कोठारे राधिका कोठारे सुभाष कोठारे शोभा नवले   आदि उपोषणाला बसले आहे मारहाण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही संपूर्ण कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment