पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे देवदूतांचा सन्मान या पुरस्काराने सन्मानित..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 5, 2021

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे देवदूतांचा सन्मान या पुरस्काराने सन्मानित..!

 पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे देवदूतांचा सन्मान या पुरस्काराने सन्मानित..!

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आरोग्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत गौरव.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी कोरोना या संकट काळामध्ये जगावर आलेल्या कोरोना या महामारीच्या संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य ब्रीद मानून, घरदार विसरून महाराष्ट्राला अभिप्रेत असणार्‍या खरा महाराष्ट्र धर्म जागवत, अविरतपणे कोरोनाशी लढा दिला व आलेल्या संकटाला न घाबरता या जैविक विषाणूचा ताठ मानाने लढा दिल्या तालुक्यात सर्वच उपाययोजनेत त्या आघाडीवर राहिल्या बद्दल त्यांना सन्मान देवदूतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान यशवंतराव चव्हाण सभागृह मुबंई येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले आरोग्य मंत्री राजेश टोपे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला
महाराष्ट्र तील विविध भागातून अनेक अनेक देवदूतांना येथे सन्मानित करण्यात आले यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पुरस्कारार्थी येथे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचे कोरोना काळामध्ये करत असलेल्या कामाचे तालुक्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे त्यांनी आपल्या ऑडिओ क्लिप च्या माध्यमातून केलेली जागृती ही राज्यभर पसरली आहे तसेच त्यांनी कोरोना संकट काळात स्वतः ग्राउंड वर जाऊन उपायोजना केल्या तसेच वेळप्रसंगी ठोस व कठोर निर्णय घेतले त्या निर्णयामुळे तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असला तरी कोरोना रुग्ण संख्येबाबत नियंत्रणात राहिला शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली त्यांच्या कामामुळे लहान मोठ्यांसह महिला व आबालवृद्धांच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण केले आहे त्यामुळे त्यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कामाची पावती असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.महसूल मधील 4 जिल्हाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला तर तहसीलदार म्हणून संपूर्ण राज्यातून त्या एकमेव आहेत या सन्माना बाबत सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
यावेळी विजयसिंह पटवर्धन कार्यकारी न्यूज18लोकमत संपादक आशुतोष पाटील संपादक पुढारी विवेक गिरधारी संकल्प व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. एन. कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment