निलेश लंके अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून धुळ्यामध्ये झाला दिव्यांग विवाह सोहळा संपन्न ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

निलेश लंके अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून धुळ्यामध्ये झाला दिव्यांग विवाह सोहळा संपन्न !

निलेश लंके अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून धुळ्यामध्ये झाला दिव्यांग विवाह सोहळा संपन्न !

निलेश लंके दिव्यांग वधू-वर सोहळा परजिल्ह्यातही ठरला कौतुकाचा विषय !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेशजी लंके यांच्या सामाजिक कार्याची दखल संपूर्ण राज्यासह देश-विदेशात घेतली जात असताना निलेश लंके अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून  आजवर अनेक अपंग बांधवांच्या न्याय हक्काची सोडवणूक या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहे . दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यांची सोडवणूक करण्यात आमदार निलेशजी लंके हे नेहमीच प्रयत्नशील असतात आपल्या मिळणार्‍या आमदारकीच्या पगारातून प्रत्येक महिन्याला एका दिव्यंग बांधवांना इलेक्ट्रॉनिक सायकल रिक्षा देणारे निलेश लंके महाराष्ट्रातील एकमेव आमदार ठरलेत .
या संस्थेच्या माध्यमातून अनेक दिव्यांग विवाह पार पडले असून श्री. सुनीलजी करंजुले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दिव्यांग विवाह पार पडले आहेत.नुसते मतदार संघातील नव्हे तर या सामाजिक कार्याची दखल घेत गुरुवार दिनांक- 02 जुलै 2021 रोजी
 चि .गणेश (श्री.मनोहर बुडामन अहिरराव पाटील   मु.पो.फापोरे ता. अमळनेर जिल्हा जळगाव   आणि  चि.सौ.का.हर्षाली (कै.बापू पुंडलिक सोनवणे, मु.पो.गणेश कॉलनी मोराणे तालुका जिल्हा धुळे ) यांचा शुभ विवाह  सुजान मंगल कार्यालय, अंमळनेर येथे पार पडला
या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य एका सक्षम मुलाने  दिव्यांग अनाथ  असणार्‍या मुलीशी, विवाह बंधन बांधले
या विवाह सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबातील नातेवाईक,मित्र मंडळ,सगेसोयरे मोठया संख्येने उपस्थित होते.    
सोलापूर जिल्ह्यातून दिव्यांग वधू-वर सूचक सोमनाथ भोसले व प्रवीण पाटील  उपस्थित होते.
नवीन दांपत्य  गणेश व हर्षाली यांना लोकनेते आमदार निलेश लंके यांनी फोनवरून शुभाशीर्वाद दिले तसेच पुढील आयुष्य,  सुखमय,आरोग्यमयजावो असा आशीर्वाद दिला.
हा विवाह आमदार साहेबांनी घेतलेल्या वधुवर सोहळ्यात जमलेला होता,परंतु कोरोना संसर्गामुळे तो त्या वेळी घेता आला नव्हता.
या शुभ मंगल कार्यासाठी,  फोनवरून श्री सुनिल करंजुले सर,जाधव सर, सुनिता वाळेकर राजेंद्र भुजबळ , संतोष जाधव , आप्पासाहेब ढोकने  उज्वला घोडके व  दिव्यांग वधू वर सुचक मंडळातील सर्व  पदाधिकारी, यांनीही शुभेच्छा रुपी शुभाशीर्वाद दिले.
निलेश लंके अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून येत्या 16 जून रोजी अजून एक लग्न मा.शरद चंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर कोविड सेंटर या ठिकाणी करण्याचा मनोदय आहे अशी यावेळी निलेश लंके अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुनील करंजुले यांनी सूचित केले.

No comments:

Post a Comment