चिंचबन रस्ता व नियोजित पुलासाठी ना. शंकरराव गडाख यांच्याकडून पाऊणेपाच कोटीची तरतूद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 13, 2021

चिंचबन रस्ता व नियोजित पुलासाठी ना. शंकरराव गडाख यांच्याकडून पाऊणेपाच कोटीची तरतूद

 चिंचबन रस्ता व नियोजित पुलासाठी ना. शंकरराव गडाख यांच्याकडून पाऊणेपाच कोटीची तरतूद

उदयनदादा गडाख यांनी दिली माहिती....


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः जेष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेबांसाठी पूर्वीपासून चिंचबन गावाने मोठे पाठबळ उभे केले आहे याची जाणीव ठेवून नामदार शंकरराव गडाख यांनी चिंचबनच्या तीन किलोमीटर डांबरीकरण रस्त्यासाठी सुमारे तीन कोटी याच रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मागील ओढ्यावरील पुलासाठी सुमारे 1 कोटी 75 लाख असे मिळून एकूण  पाऊणेपाच कोटीची तरतूद केली असल्याची माहिती युवा नेते उदयनदादा गडाख यांनी यावेळी बोलतांना दिली.
नामदार शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्यामुळे नेवासा तालुक्यातील चिंचबनला जाणार्‍या एक किलोमीटर अंतराच्या सुमारे 25 लाख रुपये खर्चाच्या तयार झालेल्या डांबरीकरण रस्त्याचे उदघाटन उदयनदादा गडाख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी चिंचबन गावातील मारुती मंदिराच्या प्रांगणात झालेल्या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी युवा नेते उदयनदादा गडाख हे बोलत होते.या भागातील जेष्ठ मार्गदर्शक जेष्ठ विधी तज्ञ अँड.एम.आय.पठाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.पंचायत समितीचे सदस्य विक्रम आप्पा चौधरी,जेष्ठ मार्गदर्शक अरुणराव शिंदे,सरपंच विठ्ठलराव शिंदे,अँड.संदीप शिंदे नगरसेवक दिनेश व्यवहारे,जालिंदर गवळी,शोएब पठाण यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी चिंचबन रोडवर एक किलोमीटर अंतराच्या पूर्ण झालेल्या डांबरीकरण रस्त्याच्या फलकाचे अनावरण उदयनदादा गडाख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी अरुण शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर सरपंच विठ्ठलराव शिंदे यांनी स्वागत केले.ग्रामपंचायतसह तरुण मंडळे व गावकर्‍यांच्या वतीने उदयनदादा गडाख यांचा सत्काराच्याद्वारे गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना उदयनदादा गडाख म्हणाले की चिंचबन गावचा आम्हाला यशवंतराव गडाख साहेबांपासून आहे,आता झालेला रस्ता एक किलोमीटर अंतराचा आहे नामदार गडाख साहेबांनी चिंचबनच्या पुढील रस्त्यांसाठी मंजुरी घेतली असून तीन किलोमीटरला तीन कोटी तसेच चिंचबन रस्त्यावर येणार्‍या ज्ञानेश्वर मंदिराच्या मागील ओढ्यावरील पुलासाठी 1 कोटी 75 लाखाची तरतूद झाली आहे साधारण सात ते आठ महिने तरी या कामाला लागणार आहे.पूल व रस्त्याच्या कामांमुळे चिंचबन भागातील दळणवळण सुधारणार आहे असे सांगून त्यांनी विकास कामांना नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली  गती दिली जाईल अशी ग्वाही बोलतांना दिली.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच अँड.गोरक्षनाथ काकडे,माजी उपसरपंच सुरेश चव्हाण, संजय जाधव,कानिफनाथ चव्हाण,सुदाम सपकाळ,महेश मापारी,किशोर काकडे,भाऊसाहेब मापारी,प्रशांत सपकाळ,राहुल सपकाळ,योगेश काकडे,विष्णू जाधव, विजय जाधव,नंदकुमार चव्हाण, राजेंद्र चव्हाण,अशोक चव्हाण,गौरव शिंदे,अनिल शिंदे,कचरू माळी, भाऊसाहेब चव्हाण, बाळासाहेब मापारी,दत्तात्रय मापारी,दत्तू यादव, विकास जाधव,दत्तात्रय जाधव,राजेंद्र बनकर,दत्तात्रय रचपुत,निखिल जाधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here