भालगाव जि.प.शाळेच्या उपशिक्षिका सुनिता निकम यांच्या घरोघरी शाळा उपक्रमाला पाल्यांची ही पसंती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

भालगाव जि.प.शाळेच्या उपशिक्षिका सुनिता निकम यांच्या घरोघरी शाळा उपक्रमाला पाल्यांची ही पसंती

 भालगाव जि.प.शाळेच्या उपशिक्षिका सुनिता निकम यांच्या घरोघरी शाळा उपक्रमाला पाल्यांची ही पसंती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा तालुक्यातील भालगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका सुनिता निकम यांनी  घरोघरी शाळा या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमास नुकतीच सुरुवात केली असून त्यांच्या या उपक्रमाला पाल्यांची पसंती मिळत आहे सदरचा उपक्रम भालगावात सर्वांचे आकर्षण ठरत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथील उपशिक्षिका श्रीमती सुनिता भाऊसाहेब निकम यांनी कोरोना लाँकडाऊनच्या काळात राबवलेल्या घरोघरी शाळा या उपक्रमाच्या फलकाचे अनावरण नेवासा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार यांच्या हस्ते तर सदस्य बाळासाहेब सोनवणे,गटविकास अधिकारी शेखर शेलार, गटशिक्षणाधिकारी सौ.सुलोचना पटारे -पुरनाळे कवयित्री सौ.संगिता फासाटे,शिक्षक बँकेचे संचालक राजेंद्र मुंगसे नितीन गायके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कोरोना काळात 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवणार्‍या या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या प्रत्येक मुलाच्या घरीच स्वतंत्र शाळा तयार करून नियमित गृहभेटीद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन केले जात आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास अभ्यासाचा सराव करण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक साहित्य संच देण्यात आला आहे.                
नेवासा बुद्रुक केंद्रातील भालगाव शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती सुनिता निकम यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की ऑनलाईन शिक्षण सर्वांपर्यंत पोहचण्यात येणार्‍या अडचणी व मोबाईलच्या वापरामुळे लहान मुलाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सदरचा उपक्रम राबवण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याचे माण तालुक्यातील वडगाव शाळेचे मुख्याध्यापक संजय खरात यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या सदर उपक्रमामुळे 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडीतपणे व प्रभावीपणे सुरू राहते.त्यामुळे  विद्यार्थी प्रगत होतो असे स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित सभागृहातील सर्व शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख साधनव्यक्ती,विषयतज्ञ इतर सर्व कर्मचारी,सर्व शिक्षक सहकारी यांच्यासह सर्व ज्ञानज्योती शिक्षिकांनी घरोघरी शाळा या उपक्रमाबद्दल उपशिक्षिका सुनीता निकम यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला.
घरोघरी शाळा उपक्रमाद्वारे शिक्षणाला नवी  उभारी मिळत आहे   लाँकडाऊनमध्येच शाळा बंद असल्यामुळे चिमुकल्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे घरी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.यासाठी भालगावाचे सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक शिक्षक सर्व पालकांचे मोलाची साथ मिळत आहे.

No comments:

Post a Comment