इंधन दरवाढ, महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

इंधन दरवाढ, महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर...

 इंधन दरवाढ, महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर...

सामान्य माणसाचं जगणं कठीण झालयं...

नगरमधील खाचखळग्यातून काँग्रेसची सायकल रॅली.

सायकल चालविताना काँग्रेस कार्यकर्त्यांची दमछाक....
  दोन दिवसापासून नगर शहरात होणार्‍या पावसामुळे रस्त्यावर पडलेल्यो खड्ड्यात साचलेले पाणी,रस्त्यावर असणारा चिखल, दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनमुळे प्रमुख रस्त्यांवर निर्माण झालेल्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली असताना शहर जिल्हा काँग्रेसने इंधन दरवाढीच्या विरोधात काढलेल्या सायकल रॅलीला शहरातील वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला फोरव्हीलरमध्ये बसणार्‍या काँग्रेस नेत्यांची, कार्यकर्त्यांची शहरात मोठी अडचण झाली असल्याचे दिसून आले. इंधन दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ काढलेल्या आज सायकल रॅलीत प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले. परंतु, या रॅलीला नगर शहरात झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला. नेहमी चारचाकी वाहनातून फिरणार्‍या काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना सायकलची सवारी जड पडली. काही पदाधिकारी वाहतूक कोंडीला वैतागले आणि सायकल सोडून देत त्यांनी कसेबसे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. माळीवाडा बस स्थानक येथून सायकल रॅली सुरू करण्यात आली. केंद्राच्या इंधन दरवाढ धोरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील सात वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किंमती सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्या आहेत.उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याची नावाखाली  मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता 850 रुपयांची गॅस सिलिंडर घेणे या गरीब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भूतान बांगलादेशाला पेट्रोल 30 रुपये लिटर व डिझेल 22 रुपये लिटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र तेच पेट्रोल, डिझेलसाठी शंभर रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह  इतर वस्तूंची महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करून ठेवले आहे. त्याच्याविरोधात काँग्रेस पक्ष आज सायकल रॅलीव्दारा रस्त्यावर उतरला. मोदी सरकारने गॅस, पेट्रोल, डिझेल  तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर तात्काळ कमी करून जनतेला दिलासा दयावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस व युवक काँग्रेस च्यावतीने आज  करण्यात आली.
गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर तात्काळ कमी करण्याकरता अहमदनगर जिल्हा काँग्रेस व अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून  सायकल रॅली काढण्यात आली होती. यामध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, काँग्रेसचे मा. शहर जिल्हाध्यक्ष व माजी महापौर दीप चव्हाण, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, ज्येष्ठ नेते जयंतराव वाघ, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब धोंडे, उपसरपंच अंकुश शेळके पाटील, युवक कार्याध्यक्ष राहुल उगले, मनोज गुंदेचा, भूषण शेळके, किसन मोरे, विलास खडके, बाबासाहेब सय्यद, रमेश ठोंबे, अनशा बापू म्हस्के,  शंकरराव साठे, मच्छिंद्र साठे, किरण पाटील, विक्रांत अब्दुले, तुषार मोरे, अमन तिवारी, अजिंक्य शिंदे, गणेश भोसले, विशाल कळमकर, चिरंजीव गाढवे, सुजय गांधी, प्रमोद अबुज, शंकर जगताप, प्रवीण गिते, सोशल मिडीया विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाने आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे आ. लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. त्यानंतर सायकलवर बसून पुढे मार्गक्रमण सुरू झाले. सकाळी झालेला पाऊस आणि त्यानंतर पडलेल्या उन्हामुळे वातावरणात दमटपणा वाढला होता. सायकल रॅली बाजार समिती समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आली. तेथे अभिवादन करून पुढे निघाली. पुढे धरती चौकाकडे येत असतानाच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठी वाहतूक सुरू होती. अनेक पदाधिकार्‍यांना सलग सायकल चालवणे शक्य होत नव्हते. वाहतूक कोंडी वाढत चालल्याने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणे कठीण होऊन बसले. तथापि, अनेकांनी सायकल चालवत रॅली पूर्ण करण्याचा विचार सोडून दिला. नाईलाजाने अन्य वाहनांचा पर्याय स्वीकारत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. काही पदाधिकार्‍यांनी सायकल सोडून देत वाहतुकीतून पायी वाट काढत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यामुळे ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची दमछाक झाली. केवळ तीन पदाधिकारी सायकल रॅली पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. इंधन दरवाढीचा निषेध करताना वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामनाही करावा लागल्याची चर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये रंगली.

No comments:

Post a Comment