जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात ग्रामस्वच्छता अभियान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात ग्रामस्वच्छता अभियान

 जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात ग्रामस्वच्छता अभियान

स्व.संदीप पाटलांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा!




नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती स्व.संदीप पाटील वराळ यांच्या जन्मदिवस निमित्ताने जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनच्या सदस्यांनी फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामअभियान ग्रामस्वच्छता अभियान राबवीत सामाजिक उपक्रम संपन्न केला.
गेली चार वर्षांपासून रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके वाटप अशा प्रकारे उपक्रम संपन्न करीत संदीप पाटील यांच्या कार्याचे प्रत्यक्ष अनुकरण करीत एक सामाजिक संदेश देण्याचे काम संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन माध्यमातून होत असते.आज दि.5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ह.भ.प देवराम महाराज लामखडे जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील  सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील , उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउलीशेठ वरखडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकार्‍यांच्या हस्ते संदीप पाटील वराळ यांच्या प्रतिमेचे पूजन करीत पुुष्पहार अर्पण करीत व उपस्थीतांनी विनम्र अभिवादन करीत संदीप पाटील यांच्या जन्मदिवस कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
त्यानंतर सकाळी साडेदहा ते एक या अडिच तासाच्या वेळेत जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील गवत निर्मुलन, कागद,कचरा गोळा करीत कुंड परिसर व मळगंगा परिसर स्वच्छ केला.यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउलीशेठ वरखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मंगेश लाळगे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ, ठकाराम गायखे, रावसाहेब वराळ, माजी सदस्य भिमराव लामखडे, पारनेर तालुका पैलवान प्रतिष्ठानचे पदाधिकारी पैलवान सुभाष वराळ, निलेश घोडे, रवि लंके, स्वप्नील आतकर,चेतन वराळ, प्रतिक वरखडे, मनोज इधाटे, हरेश ससाणे, सागर वराळ, विलास वराळ, आप्पा वराळ, आकाश वराळ, ऋषि साबळे, गंगा वरखडे, मेजर विकास वराळ, राहुल वराळ, अभिषेक वराळ, रामभाऊ वराळ, किसन वराळ,अक्षय वराळ, गणेश वराळ, स्वप्निल आतकर, योगेश वराळ, सौरभ वराळ, निलेश खोबरे, अविनाश वराळ, राजू वराळ , हेमंत वराळ आदी तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे पदाधिकारी व सदस्य, संदीप पाटील वराळ युवामंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर व मास्क सॉनिटायझर यांचा वापर करून कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मंगेश लाळगे यांनी संदीप पाटील यांचे अनुभव सांगताना सांगितले की गेली आठ ते दहा वर्षांच्या कार्यकाळात ग्रामपंचायत, बाजार समीती, पंचायत समिती या माध्यमातून विकासकामे करताना आपल्या कामांमधून गाव व परिसराचा विकास कसा होईल.व याचा फायदा सर्वसामान्य गोरगरीब गरजू घटकांना कसा होईल यासाठी संदीप पाटील यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. जनतेच्या आग्रहास्तव त्यांना पदे मिळाली. जनतेचे पाठबळ व आशिर्वाद त्यांना सातत्याने मिळत गेला.त्यातूनच तालुका पातळीवर काम करताना त्यांचा संपर्क वाढत गेला.आम्ही सर्व कार्यकर्ते व त्यांचा मित्रपरिवार पाटलांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करीत होतो.आपल्या वाढदिवसाचा खरा फायदा गोरगरीब जनतेला झाला पाहिजे हा संदीप पाटील यांचा दृष्टिकोन होता.म्हणून त्यांचा जन्मदिवस सुद्धा संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व आम्ही सर्व सहकारी सामाजिक दिवस म्हणून साजरा करीत आहोत.आमचे संदीप पाटील आमच्यात आहेत.ते संचिन पाटील यांच्या रुपाने समाजात काम करीत आहेत ही जनतेची भावना आहे.प्रेमरुपी आशिर्वाद आहे.अशी भावना यावेळी मंगेश लाळगे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment