नगरसेवक सचिन नागपुरे पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाविरोधात आक्रमक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

नगरसेवक सचिन नागपुरे पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाविरोधात आक्रमक

 नगरसेवक सचिन नागपुरे पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाविरोधात आक्रमक


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा नगरपंचायत येथे सुरू असलेल्या संत गती कारभारा विरोधात नेवासा नगरपंचायत चे नगरसेवक गटनेते सचिन नागपुरे यांनी विविध समस्यांचे निवेदन नगरपंचायतचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांना दिले.
निवेदनामध्ये त्यांनी नेवासा नगरपंचायत हद्दीतील प्र.5 6 7 या प्रभागातील नागरिकांना  पाच ते सहा दिवसांनी होणार्‍या पाणीपुरवठ्यावर लक्ष वेधले त्याचप्रमाणे नगरपंचायत हद्दीतील स्वच्छता विभागाची कामासंदर्भात तक्रारीबाबत चर्चा केली नगरपंचायतने दिलेले ठेकेदार काम न करता जास्तीची बिले  घेत आहेत हे निदर्शनास आणून दिले .त्याचप्रमाणे नेवासा शहरात गेल्या अनेक दिवसापासून शहरातील अनेक भागात अंधारमय परिस्थिती असून विजेच्या खांबावर लाईट  बसले नाहीत याविषयी चर्चा करत असताना श्री निखिल नवले साहेब यांनी चार ते पाच दिवसात लाईट बसवण्यास सुरुवात करू असे आश्वासन दिले ,नेवासा नगरपंचायत हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून घरकुल धारकांना घरकुल चे कामे पूर्ण होऊन देखील त्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळत नाहीत हादेखील मुद्दा त्यांनी उपस्थित केला .त्याच प्रमाणे नगरपंचायत चे कर्मचारी कोरोणा काळातदेखील  काम करत होते त्यांच्या देखील पगाराचे पैसे दोन ते तीन महिन्यापासून थकीत आहे, यासंदर्भात देखील गटनेते सचिन नागपुरे यांनी चर्चा करून संपूर्ण विषय मार्गे लावण्याचे आश्वासन घेतले, हे विषय मार्गी न लागल्यास पुढे शहर भाजपासह आक्रमक आंदोलन करणार आहे असे यावेळी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment