कौतुकास्पद बातमी : शिर्डी येथील अभिषेक कासार चीनमध्ये प्रथम श्रेणीतून एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 6, 2021

कौतुकास्पद बातमी : शिर्डी येथील अभिषेक कासार चीनमध्ये प्रथम श्रेणीतून एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण

 कौतुकास्पद बातमी : शिर्डी येथील अभिषेक कासार चीनमध्ये प्रथम श्रेणीतून एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण

नैवेद्य बनवणाऱ्या कंत्राटी महिलेचा मुलगा झाला डॉक्टर..!शिर्डी | दि.६ प्रतिनिधी : ( तुषार महाजन )

चीनमध्ये प्रथम श्रेणीतून एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या शिर्डीतील अभिषेक रावसाहेब कासार या सामान्य कुटुंबातील तरुणाने परराष्ट्र वैद्यकीय परीक्षेत देशात आठवा तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विदेशात वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देशात वैद्यकीय सेवेची मान्यता मिळण्यासाठी परराष्ट्र वैद्यकीय परीक्षेच्या दिव्यातून जावे लागते. शिर्डीतील अभिषेक कासार याने या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून शिर्डी व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. अभिषेक हा साई संस्थानचे लिपिक रावसाहेब कासार व अनेक दिवस साईबाबांसाठी मंदिरात नैवेद्य बनवण्याचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगार संगीता कासार यांचा मुलगा आहे. अभिषेक याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिर्डीतील साईनाथ विद्यालयात मराठी माध्यमातून तर उच्च शिक्षण एसएसजीएम कॉलेज कोपरगाव येथून घेतले. यानंतर त्याने चीन येथील जीनागक्सी विद्यापीठातून एमबीबीएस पदवी घेतली. भारताबाहेर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या यंदा राष्ट्रीय परीक्षा बोर्डामार्फत झालेल्या परीक्षेत अभिषेकने देशात आठवा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला. त्याला या परीक्षेत ३०० पैकी २२६ गुण मिळाले या परीक्षेचा निकाल अवघा २३.७३ टक्के लागला आहे. अभिषेक कासार यांचे या उत्तुंग यशाबद्दल अभिनंदन करत असून त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. गरीब परिस्थितीत पण जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर अभिषेक डॉक्टर झाला. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कान्हुराज बगाटे व उपकार्यकारी श्री. रविंद्र ठाकरे यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here