नागरिकांच्या सामाजिक कर्तव्यामुळे समाधान नगरचा कायापालट- महापौर रोहिणीताई शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 20, 2021

नागरिकांच्या सामाजिक कर्तव्यामुळे समाधान नगरचा कायापालट- महापौर रोहिणीताई शेंडगे

 नागरिकांच्या सामाजिक कर्तव्यामुळे समाधान नगरचा कायापालट- महापौर रोहिणीताई शेंडगे

आषाढी एकादशीचे औचित्य साधून वृक्षारोपनातून पर्यावरणाचा संदेश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कल्याण रोड वरील समाधान नगर येथील नागरिकांनी आपली नोकरी व व्यवसाय संभाळून सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचे कामे करित आहेत हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. या भागातील नागरिक एकत्र येवून वर्षभर सकारात्मक दृष्टीकोनातून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम करित आहे. शासनाच्या योजनेची वाट न पाहता श्रमदानातून व स्वखर्चातून जे काही शक्य होईल ते सामाजिक काम करित आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षामध्ये नागरिकांच्या सामाजिक कर्तव्यामुळे समाधान नगरचा कायापालट झाला आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून या भागातील नागरिकांनी वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. त्यामुळे समाजामध्ये पर्यावरणाचा संदेश जाईल वृक्षारोपन व संवर्धन ही योजना नागरिकांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होवू शकत नाही. यासाठी समाजामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. समाधान नगर मधील नागरिकांचा आदर्श इतर भागातील नागरिकांनी घेवून वृक्षारोपन ही एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रयत्न करावे. नगरसेवक आप्पा (शाम) नळकांडे, सचिन शिंदे, व नगरसेविका मा.सौ.पुष्पाताई बोरूडे यांच्या सहकार्यातून प्रभाग क्र. 8 च्या विकास कामातून शहरात मॉडेल ठरेल असे  प्रतिपादन महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी केले.
कल्याण रोड वरील समाधान नगर येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्षारोपन करताना महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, प्रमोद जरे, प्रफुल्लसिंग परदेशी, रविंद्र पांडे, बाळासाहेब निवडुंगे, राजू तांबोळी, भगवान गायसमुद्रे, काशिनाथ गोलवड, सचिन गोलवड, शरद दाते, बाळासाहेब पवार, संदिप धोत्रे, नसरूद्दीन सय्यद, एकनाथ भोगाडे, संजय घायवट, इम्रान तांबोळी, संपत पंडित, भास्कर सोनवणे, प्रितम बिज्जा, दिपक नवले, सुनिलसिंग परदेशी, संध्याताई धायवट, ताराबाई धोत्रे, आशाताई पवार, सोनालीताई दाते, स्नेहलताई शिंदे, पुजाताई जरे, रोहिणीताई जबे, सीमाताई ठाकूर, सवित्राताई पांडे, रोहिणीताई शेळके, रेखाताई रासकर, वैशालीताई खोपे, रेश्माताई पंडित, प्रणालीताई नवले, सुनिताताई थोरात, शोभाताई न्यायपेल्ली, छायाताई नवले, रंजनाताई खरमाळे आदी उपस्थित होते.
नगरसेवक मा.श्री.शाम नळकांडे म्हणाले की, प्र.क्र. 8 मधील नागरिकांनी विश्वास टाकून आम्हाला नगरसेवक पदावर निवडून दिले. त्यामाध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण काम करित आहोत. निवडणुकीच्या कामामध्ये दिलेले आश्वासने पूर्ण केली जात आहेत. त्यामुळे विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचे काम केले आहे. समाधान नगर मधील नागरिकांच्या एकोप्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे. लोकवर्गणीच्या माध्यमातून टप्प्या टप्प्याने प्रश्न सोडवित आहेत. सामाजिक कामासाठी सर्वजण एकत्र येवून विविध उपक्रम राबवित असतात. वृक्षारोपणाचा केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. दर रविवारी सर्वजण एकत्र येवून श्रमदानातून एक एक प्रश्न मार्गी लावित असतात. स्वच्छता अभियानामुळे या भागाच्या सौदर्यकरणात भर पडली आहे. पुढील काही दिवसात हा परिसर स्वच्छ, सुंदर व हरित म्हणून ओळखला जाईल असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.बाळासाहेब निवडुंगे सर यांनी केले तर आभार श्री.संजय घायवट यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here