श्री छत्रपती सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

श्री छत्रपती सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

 श्री छत्रपती सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

माळीवाडा व नालेगाव तलाठी कार्यालयात माहिती फलकाचे अनावरण

माळीवाडा व नालेगाव तलाठी कार्यालयात माहिती फलक नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करुन हा फलक लावण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. या माहिती फलकामुळे नागरिकांची कामे विना अडचण होण्यास मदत होणार आहे.
- हरिभाऊ वाघचौरे (संस्थापक अध्यक्ष, श्री छत्रपती सामाजिक संघटना)


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नागरिकांच्या सोयीसाठी माळीवाडा व नालेगाव तलाठी कार्यालयात माहिती फलक लावण्यात आले. श्री छत्रपती सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले असून, सदर फलक लावण्यासाठी संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
तलाठी कार्यालयातील माहिती फलकाचे अनावरण मंडळ अधिकारी राजेंद्र आंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ वाघचौरे, नालेगाव तलाठी सागर भापकर, माळीवाडा तलाठी सुनिल खंडागळे, जनार्धन साळवे, सागर भिंगारदिवे, संघटनेचे शहराध्यक्ष सुरज रोहोकले, शिवकुमार शेळके, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक कोल्हे, सचिन एकाडे, दीपक पाचारणे, सिमोन बोर्डे, राजेंद्र जगताप, राजेंद्र दळवी, विकास भांबरकर, प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते. माळीवाडा व नालेगाव तलाठी कार्यालयात विविध कामासाठी नागरिक येत असतात. कोणत्या कामासाठी किती शुल्क, कोणते काम निशुल्क तर किती कालावधी लागत असल्याची माहिती नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. कर्मचारी व नागरिकांमध्ये अनेकवेळा वाद निर्माण होत होते. काम घेऊन आलेल्या नागरिकांना योग्य माहिती मिळण्यासाठी कार्यालयाबाहेर माहिती फलक लावण्याची मागणी श्री छत्रपती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. सदर फलक लावण्यात आल्याने नागरिकांना योग्य माहिती मिळून त्यांचे काम योग्य पध्दतीने होणार आहे.

No comments:

Post a Comment