छिंदमने शिवसेना उपजिल्हा प्रमुखांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांची शहानिशा करावी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

छिंदमने शिवसेना उपजिल्हा प्रमुखांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांची शहानिशा करावी.

 छिंदमने शिवसेना उपजिल्हा प्रमुखांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांची शहानिशा करावी.

शहर शिवसेनेचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन...

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीपाद छिंदम व त्यांचे सहकारी संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे कि ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे वादातील जागा खरेदी करणे व बाहेरगावावरून गुंड आणून जमिनीचा ताबा घेणे हा त्यांचा व्यवसाय आहे.तसेच यापूर्वीही दिल्ली गेट येथील नम्रता गॅलरी या दुकानाची मोडतोड रात्री जे.सी.बी. लावून केली होती व सदर जागेचा अनधिकृतपणे ताबा घेतला होता. अशाप्रकारे नगर शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील अनेक जागेचे ताबे घेतले आहे.नगरमधील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मोबारकर यांना छींदम बंधूंनी सुपारी घेवून मारहाण केली होती. तसेच त्यांच्या या कृत्यामुळे त्यांना दोन ते तीन वेळा नगर शहर व परिसरातून हद्दपार केले होते. बेकायदेशीर कृत्ये करणार्‍या छिंदम याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव व इतरांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करावी अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना जिल्हा उपप्रमुख व इतरांवर तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याची शहानिशा करून नाव वगळण्या बाबत व खोटे गुन्हा दाखल करणार्‍या फिर्यादी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन शहरशिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीसअधीक्षक यांना देण्यात आले.
पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम व त्यांचे गुंड यांनी दिल्ली गेट येथील भागीरथ बोडखे यांचे ज्यूस सेंटर पाडून त्यांचे गल्यातील रोख रक्कम लाटून नेली व त्यांचेज्यूस सेंटर पाडून ज्यूस सेंटरच्या जागेत व त्या जागेच्या लगत 12 पत्र्याचे बेकायदेशीर गाळे आणून मांडले त्यामुळे भागीरथ बोडखे यांनी श्रीपाद छिंदम यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.न 584/2021 दाखल केला आहे. त्यावेळेपासून श्रीपाद छिंदम व त्यांच्या मनात गिरीष जाधव व इतरांविरुद्ध राग आहे. राग व द्वेषापोटी श्रीपाद छिंदम यांचा गुंड मित्र विजय रमेश सामलेटी याने श्रीपाद छिंदम यांच्या सांगण्यावरून गिरीष जाधव यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन येथे 60 हजार रुपये मागितले व दमदाटी केल्याचा  गुन्हा दाखल केला. वास्तविक पाहता विजय सामलेटी यांनी फिर्यादीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दि.12 जुलै रोजी असा कोणताही प्रकार घडलेला नाही. त्यावेळी गिरीष जाधव हे त्याच्या घरी बागरोजा हडको येथेच होते.तसेच फिर्यादी याने फिर्यादीमध्ये नमूद केलेल्या घटना ठिकाण व त्यांच्या परिसरात अनेक ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे दुकानदारांनी बसविलेले आहेत.ते सर्व सी.सी.टीव्ही फुटेज चेक केले असता दि.12जुलै रोजी सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान फिर्यादीने नमूद केलेला कोणताही प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट होईल.फिर्यादीने केवळ त्यांचा मित्र श्रीपाद छिंदम यांच्या सांगण्यावरून गिरीष जाधव व इतरांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे. 15 जुलै रोजी विजय रमेश सामलेटी यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला गु.र.न 585/2021 यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावे व खोट्या गुन्ह्यामध्ये गिरीष जाधव यांना अटक करू नये व त्यांच्या विरुद्ध दाखल असलेला गुन्हा रद्द करावा व श्रीपाद छिंदम व विजय रमेश सामलेटी यांच्या विरुद्ध एमपीआयडी कायद्दा अन्वये कारवाई करावी. असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी संभाजी कदम,विक्रम राठोड, दत्ता कावरे,दीपक खैरे, बाळासाहेब बोराटे, प्रशांत गायकवाड,जेम्स आल्हाट,सचिन शिंदे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment