स्वप्नीलच्या आत्महत्येची अजित पवारांनी घेतली दखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 5, 2021

स्वप्नीलच्या आत्महत्येची अजित पवारांनी घेतली दखल.

 स्वप्नीलच्या आत्महत्येची अजित पवारांनी घेतली दखल.

‘एमपीएसीसी’त उत्तीर्ण... पण नोकरी नाही.

31 जुलै पर्यत ‘एमपीएसीसी’ च्या सर्व जागा भरणार !


मुंबई ः
‘एमपीएसीसी’ची परिक्षा देऊनही हातात नोकरी नाही, आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही आपण कुटुंबीयांना मदत करू शकत नसल्यामुळे पुण्यातील स्वप्निलन लोणकरने बुधवारी त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत भावनांना वाट मोकळी करून दिली.येणार्‍या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जात आहे. दोन वर्ष झाली पासआऊट होऊन आणि 24 वय संपत आले आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परिक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करून कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतरांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना”, असे मानसिक द्वंद्व स्वप्निलने त्याच्या चिठ्ठीतून मांडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विधानसभेत मांडला. तसेच सुधीर मुनगंटीवार यांनीही या कुटूंबाला आर्थिक मिळावी अशी मागणी केली. या मागणीवर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या मुद्दयावर सरकारची भूमिका मांडली.
येत्या 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येतील अशी माहिती अजित पवार यांनी विधानसभेत सभागृहाला दिली. स्वप्नील लोणकरने घेतलेल्या निर्णयामुळे खूपच दुःख झाले आहे. पण कोणतेही सरकार असो अशी घटना घडायला नको होती असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. स्वप्नीलच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकार सकारात्मक भूमिका घेणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
नोकरी मिळाल्यावर घरासाठी घेतलेले कर्ज फेडता येईल, असे स्वप्निलला वाटत होते. त्याच्या इच्छेनुसारच त्याचे वडिलांनी कर्ज काढून घर बांधले. कर्जाच्या हप्त्याची परतफेड सुरू असताना ’एमपीएससी’ची दोनदा परिक्षा देऊन, त्यामध्ये उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही, याचे त्याला दुःख वाटत होते. त्या तणावातूनच त्याने आत्महत्या केली. विधानसभेत फडणवीसांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वप्निलचे निधन हे अतिशय दुखद आहे. मुख्यमंत्रीही वेळोवेळी ही सगळी भरती प्रक्रिया करण्यासाठी आग्रही असतात. याआधी एमपीएससीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी स्वतः चर्चा केली होती. एमपीएससी स्वायत्त आहे, पण सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वाना मान्य करावे लागतात असेही अजितदादा म्हणाले. याआधी सर्वोच्च न्यायालयाचे 5 मे 2021 चा अंतरीम आदेश, कोविडची साथ यामुळे मधल्या काळ्यात प्रक्रिया होऊ शकली नाही. यावर मार्ग काढण्याची सरकारची भूमिका आहे. सरकार या संपुर्ण प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतील असेही अजितदादा म्हणाले.
मला माफ करा, 100 जीव वाचवायचे होते; पण प्लेटलेट डोनेशन करून 72 राहीले’, अशी वळणदार व तितक्याच सुंदर अक्षरात स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने मृत्युपूर्व चिठ्ठी लिहिली. एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 28 वेळा दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना वाचविण्यासाठी स्वप्निलने प्लेटलेट दान करण्याचे काम केले, मात्र 100 जणांसाठी काम करण्याची त्याची इच्छा अपुरीच राहीली ! स्वप्नील लोणकरने 2019 मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यावेळी 3671 उमेदवार पात्र ठरले, तर 1200 पदांकरिता ही परीक्षा पार पडली होती. पण एसईबीसीच्या आदेशामुळे संपुर्ण भरती प्रक्रिया थांबली. मुलाखती होऊ शकल्यान नाही. त्यानंतरचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि कोविडची साथ यामुळे संपुर्ण भरती प्रक्रियेवर मर्यादा आल्या असेही अजितदादा यांनी सभागृहात सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here