बाजारपेठ ‘अनलॉक’ पण, व्यवसाय लॉक! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 5, 2021

बाजारपेठ ‘अनलॉक’ पण, व्यवसाय लॉक!

 बाजारपेठ ‘अनलॉक’ पण, व्यवसाय लॉक!

कोरोना निर्बंधाचा, व्यापार्‍यांना आर्थिक फटका; 4 च्या आत ग्राहक दुकानात फिरकेना...

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे  व्यापार्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी भरून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा माल पडून आहे. आता महत्त्वाचा हंगाम निघून गेला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता असली तरी, बाजारपेठेत ग्राहक नाहीत. सोशल मीडिया, ऑनलाइन अशा पर्यायांना ग्राहक पसंती देत असल्याने व्यावसायिक अक्षरशः हतबल झाले आहेत. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अर्थव्यवस्था रुळावर यावी, या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यानंतर हळूहळू व्यवहार पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बाजारपेठेत अद्यापही खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये हवी तशी गती आलेली नाही. त्यामुळे व्यापार्‍यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी त्याचा फटका अद्याप व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. कोरोना काळात लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका सहन करावा लागला आहे. राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणताना दुकानांच्या निर्बंधांमुळे व्यापारांमध्ये नाराजी दिसून आली. कोरोनाच्या काळात मागील दीड वर्ष व्यापारी वर्गाला मोठा फटका बसलेले असताना त्यांनी मोठ्या हिंमतीने पुन्हा व्यवसाय सुरु केला मात्र दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळांनी व्यापारांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या या निर्बंधांमुळे 4 लाखांहून अधिक व्यापारी वर्ग संकटात आला आहे.
शनिवार..रविवार.. दोन दिवसांच्या या विकेंड लॉकडाउनच्या दिवसात शहरातील व्यापार्‍यांनी शटर बंद ठेवले. रस्त्यावरही शुकशुकाट दिसला. शहरातील बाजारपेठेत गर्दी सायंकाळी पाचच्या पुढे दिसून येते. मजूर, नोकरदार, गृहिणी कामकाज आटपून सायंकाळी पाचच्या पुढे मार्केटमध्ये येत असतात ,पण शासनाने चार वाजण्याच्या पुढे दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला यााचा मोठा आर्थिक फटका व्यापारी वर्गाला बसला आहे
अहमदनगर जिल्ह्यात जवळपास 4 लाख व्यापारी असून त्यातील अडीच लाख व्यापारी किरकोळ क्षेत्रातील आहेत. तर 25 टक्के दुकाने ही अत्यावश्यक सेवेतील आहेत. या व्यापारी वर्गाने कोरोना काळात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना केला. मात्र त्यांनी पुन्हा एकदा दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला मात्र दुकानांवर घातलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा एकदा त्यांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. सरकारकडून हा निर्णय बदलण्यात यावा अशी मागणी व्यापारांनी केली आहे.
लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथलता आणताना सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असून शनिवार रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस विक्रीसाठी मुख्य दिवस असतात मात्र या दिवशी दुकाने बंद राहिल्याने व्यापारांचे मोठे नुकसान होत आहे. शनिवार रविवार दुकाने बंद ठेवून सरकारला काय साध्य करायचे आहे असा प्रश्न व्यापारी आता विचारु लागले आहेत.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे  व्यापार्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी भरून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा माल पडून आहे. आता महत्त्वाचा हंगाम निघून गेला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता असली तरी, बाजारपेठेत ग्राहक नाहीत. सोशल मीडिया, ऑनलाइन अशा पर्यायांना ग्राहक पसंती देत असल्याने बुटीक व्यावसायिक अक्षरशः हतबल झाले आहेत.जळगाव बुटीक व्यवसाय न्यूजहेही वाचा - प्रत्येक विभागाने सोपवलेली जबाबदारी समन्वयातून पार पाडावी - जिल्हाधिकारीआपल्याकडे कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग जसा वाढत गेला, तसा लॉकडाऊनही टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. लॉकडाऊनच्या काळाला पाहता-पाहता आज साडेचार महिने उलटले आहेत. या काळात सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाल्याने अर्थचक्र थांबले. यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने ’मिशन बिगीन अगेन’ यानुसार लॉकडाऊनमुळे टप्प्याटप्प्याने शिथिलता प्रदान करायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठ ’अनलॉक’ झाली असली तरी ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी व्यवसाय मात्र ’लॉक’ असल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरात कापड बाजार,नवीपेठ, चितळे रोड, शहाजी रोड याठिकाणी कापड तसेच अन्य व्यावसायिकांची दुकाने आहेत. नामांकित ब्रॅडच्या पॅन्टस शर्टस ब्ी शर्टस,भव्य दालनाते प्रचलित फॅशनचे रेडिमेड कपडे, ड्रेस तसेच ड्रेस मटेरियल मिळते. लॉकडाऊनपूर्वी व्यावसायिकांची महिन्याकाठी सुमारे 22 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल होत होती. मात्र, आता लॉकडाऊननंतर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल थेट 5 ते 10 लाख रुपयांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत नफा तर सोडा पण, दुकान, शोरुमचा मेंटेनन्स, कामगारांचे पगार असा दैनंदिन खर्चही निघत नसल्याचे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याशिवाय कर्जाचे हप्ते, विविध कर, कंपन्यांकडून क्रेडिटवर घेतलेल्या मालाचे पैसे कसे द्यायचे, या विवंचनेत बुटीक व्यावसायिक सापडले आहेत.
या काळात महिला, तरुणी तसेच लहान मुलींसाठी फॅशनेबल कपड्यांना, ड्रेस मटेरियलला मोठी मागणी असते. याशिवाय नववधूंच्या ड्रेसची देखील प्रचंड मागणी असते. त्यामुळे आम्ही सर्व व्यावसायिक हा व्यवसायाचा हंगाम लक्षात घेऊन हंगामपूर्वीच माल भरून ठेवतो. परंतु, यावर्षी कोरोनामुळे आमचे सर्व नियोजन फसले. हंगामाचा मूळ काळ लॉकडाऊनमुळे वाया गेला. लाखो रुपयांचा माल पडून आहे. एक रुपयाचाही व्यवसाय झाला नाही. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते, कंपन्यांकडून घेतलेल्या मालाचे पैसे, कर कसे भरायचे हा प्रश्न आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने कर्जाचे हप्ते तसेच कर वसुलीत काही तरी सवलत देऊन व्यापार्‍यांना दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी व्यापारी वर्ग करत आहे.
सरकारने ’मिशन बिगीन अगेन’ नुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी कोरोनाच्या संसर्ग लक्षात घेऊन, आवश्यक ती खबरदारी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. व्यवसाय करताना गर्दी होऊ नये म्हणून फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, 5 पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये, मास्क आणि हँड सॅनिटायझरचा सक्तीने वापर करणे, सम-विषम पद्धतीने दुकाने उघडणे, दुकाने तसेच शोरुममध्ये कपड्यांचे ट्रायल रूम बंद ठेवावेत, अशा प्रकारचे अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ग्राहक खरेदीला बाहेरच पडत नाहीत. या सर्वांवर पर्याय म्हणून व्यवसाय करण्यासाठी मालाची होम डिलिव्हरी किंवा ऑनलाईन, सोशल मीडियाचा पर्याय आहे. पण त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. व्यवसाय हा पूर्णपणे ग्राहकांच्या आवडीवर अवलंबून आहे. खरेदीसाठी दुकानात येणारा ग्राहक एक ड्रेस घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रंग, पॅटर्न, कापडाचा दर्जा निरखून पाहतो. त्यानंतर फिटिंगसाठी अनेकवेळा ट्रायल करतो. परंतु, ऑनलाईन किंवा सोशल मीडियावरून केलेल्या जाहिरातीत ग्राहकाला हे पर्याय उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्राहक माल खरेदी करत नाहीत. म्हणून  व्यवसायासाठी ऑनलाईन, सोशल मीडियाचा पर्याय निष्फळ ठरला आहे.
कोरोनामुळे व्यवसायाचा हंगामाचा महत्त्वाचा काळ हातून निघून गेला. अडचणीत असलेल्या व्यापार्‍यांना आता पुढे येणार्‍या दसरा, दिवाळी सणांच्या काळातच व्यवसाय सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.  दिवाळीपर्यंत कोरोना आटोक्यात आला नाही तर मात्र काही खरे नाही. अशीच स्थिती कायम राहिली तर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल. व्हिडिओ कॉलिंग, व्हाट्सअ‍ॅपवर खरेदी करण्यास ग्राहक पसंती देत नाहीत. कारण ड्रेसचा रंग, साईज अशा बाबतीत ग्राहक संभ्रमात असतो. त्यामुळे हे पर्याय निरर्थक ठरले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here